शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
4
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
5
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
6
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
7
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
8
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
9
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
10
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
11
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
12
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
13
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
14
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
15
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
16
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
17
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
18
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
19
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
20
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!

माझी वसुंधरा अभियानात रिसोड नगर परिषद अव्वल; मंगरूळपीर माघारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 12:37 IST

Risod Municipal Council tops my Vasundhara campaign : अमरावती विभागात पहिला येण्याचा बहुमान रिसोड परिषदेने पटकाविला.

लोकमत न्यूज  नेटवर्कवाशिम : भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वांवर आधारित पर्यावरणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी माझी वसुंधरा अभियानांतर्गत राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आली. पर्यावरणदिनी ५ जून रोजी या स्पर्धेचे निकाल घोषित झाले असून, यामध्ये जिल्ह्यासह अमरावती विभागात पहिला येण्याचा बहुमान रिसोड परिषदेने पटकाविला. वाशिम नगरपरिषद जिल्ह्यात चौथ्या, तर मंगरूळपीर नगरपरिषद सर्वात शेवटच्या अर्थात सहाव्या क्रमांकावर आहे.शहराची स्वच्छता राखली जावी यासह पर्यावरणाचे संतुलन कायम राखण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याबरोबरच नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी २ ऑक्टोबर २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये माझी वसुंधरा अभियान राबविण्यात आले. भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वांवर आधारित पर्यावरणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबविणे आणि नागरिकांमध्ये जनजागृती करणे यासाठी स्पर्धाही घेण्यात आली. वृक्षारोपण, कचरा संकलनासाठी घंटागाड्यांचा वापर, सुका व ओल्या कचऱ्याचे विलगीकरण, वायु गुणवत्ता तपासणी यासाठी विविध उपक्रम नगरपरिषद, नगरपंचायतीने राबविले. शहरात हरितकरण वाढविण्यासाठी उद्याने संवर्धन व सौंदर्यीकरण, रस्त्याच्या बाजूला वृक्षारोपण यासारखे उपक्रम राबविणे अपेक्षित होते. या स्पर्धेचा निकाल ५ जून रोजी जाहीर झाला असून यामध्ये रिसोड नगरपरिषद अव्वल ठरली आहे. रिसोड नगरपरिषदेला ३३२ गुण मिळाले आहेत. दि्वतीय क्रमांकावर २७८ गुण घेत कारंजा नगरपरिषद, तृतीय क्रमांकावर मालेगाव नगरपंचायत, चौथ्या क्रमांकावर वाशिम नगरपरिषद, पाचव्या क्रमांकावर मानोरा नगरपंचायत, तर सहाव्या क्रमांकावर मंगरूळपीर नगरपरिषद आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :Risodरिसोडwashimवाशिम