शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
3
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
4
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
5
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
6
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
7
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
8
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
9
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
10
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
11
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
12
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
13
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
14
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
15
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
16
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
17
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
18
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
19
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
20
Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद दुर्घटनेनंतर विमानसेवांच्या प्रतिष्ठेवरही गंभीर परिणाम!

रिसोड नगर परिषद निवडणुकीत भारिप-बमसंची स्वबळाची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 13:12 IST

रिसोड (वाशिम) : आगामी रिसोड नगर परिषद निवडणुकीत भारिप-बमसं स्वबळावर लढणार असून, तशी घोषणा जिल्हाध्यक्ष युसूफ पुंजानी यांनी रविवारी रिसोड येथील आढावा बैठकीत केली.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : आगामी रिसोड नगर परिषद निवडणुकीत भारिप-बमसं स्वबळावर लढणार असून, तशी घोषणा जिल्हाध्यक्ष युसूफ पुंजानी यांनी रविवारी रिसोड येथील आढावा बैठकीत केली. यामुळे नगर परिषदेत तिरंगी, चौरंगी लढत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.रविवार, ४ नोव्हेंबर रोजी भारिप-बमसंच्या स्थानिक कार्यालयात आगामी निवडणूक व पक्षाची भूमिका यासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी प्रदेश महासचिव तथा जिल्हाध्यक्ष युसूफ पुंजानी, जिल्हा महासचिव डॉ. नरेश इंगळे, हिंगोली जिल्हा निरीक्षक डॉ. रवींद्र मोरे पाटील, प्रा. प्रशांत गोळे, सोनाजी इंगळे, ख्वाजा भाई, शहराध्यक्ष प्रदीप खंडारे, तालुकाध्यक्ष सभादिंडे, दिलीप नवघरे, चंदन राठोड, हरिदास बनसोड, जिल्हा महिला आघाडी प्रमिला शेवाळे, मुनिरभाई, वसीम पठाण, मुन्ना भाई, गिरीधर शेजुळ, डाखोरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी नगराध्यक्ष पदासह १० प्रभागामध्येही भारिप-बमसंने वंचित बहुजन घटकांना सोबत घेऊन स्वबळावर निवडणूक लढवावी, असा सूर पदाधिकारी, कार्यकर्त्यांमधून निघाला. या पृष्ठभूमीवर नगराध्यक्ष पदासह १० प्रभागामध्ये भारिप-बमसं स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचे जिल्हाध्यक्ष पुंजानी यांनी जाहिर केले.

टॅग्स :washimवाशिमBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघRisodरिसोड