शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रिसोडची बाजारपेठ बुधवारपर्यंत राहणार बंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 12:33 IST

दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय रिसोड येथील व्यापारी महासंघाने १४ जून रोजी घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : जिल्ह्यात ११ जूनपर्यंत कोरोनामुक्त असलेल्या रिसोड तालुक्यात १२ जूनला कोरोनाचा शिरकाव झाला. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी १४ जून, रविवारी दुपारी २ वाजतापासून ते बुधवार, १७ जूनपर्यंत बाजारपेठ व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय रिसोड येथील व्यापारी महासंघाने १४ जून रोजी घेतला.रिसोड तालुक्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण नसल्याने नागरिक बिनधास्त शहरात फिरत होते. बाजारपेठेतही विविध वस्तू, साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची एकच गर्दी होत होती. १२ जून रोजी दोन आणि १३ जून रोजी ३ असे दोन दिवसात पाच कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. विशेष म्हणजे बाहेरगावावरून आलेल्या नागरिकांमुळे शहर व तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने व्यापाऱ्यांसह आरोग्य यंत्रणा, पोलीस व तालुका प्रशासन अलर्ट झाले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी रिसोड येथील व्यापारी महासंघाने स्वयंस्फुर्तीने रिसोड बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय १४ जून रोजी रिसोड व्यापारी महासंघातर्फे येथील व्यापारी संजय बगडिया यांचे दुकानावर आयोजित सभेमध्ये घेतला. बुधवार, १७ जूनपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. यादरम्यान १८ जूनपासून व्यापार सुरू करण्यावर चर्चा करण्यात आली. चर्चेत गुरुवारपासून सुरू होणाºया दुकानांची वेळ सकाळी नऊ ते दुपारी २ अशी राहिल, असे ठरविण्यात आले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, याला जनतेने देखील सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यापारी संघटनने व्यक्त केली. रिसोड शहरात ग्रामीण भागातून विशेषत: अन्य कोरोनाग्रस्त जिल्ह्यातून मोठ्या संख्येने लोक खरेदी करण्यासाठी गर्दी करीत असतात. त्यामुळे समुह संसर्गाचा धोका नाकारता येत नाही. बैठकीला व्यापाऱ्यांची उपस्थिती होती.

व्यापारी मंडळाचे वाशिम बंदचे आवाहनवाशिम शहरातील व्यापाºयांनी आपापली दुकाने बंद ठेवून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन व्यापारी मंडळाचे जिल्हाध्यक्ष जुगलकिशोर कोठारी यांनी केले. दरम्यान दुसºया संघटनेने मात्र बाजारपेठ बंदबाबत ठोस भूमिका न घेतल्याने संभ्रम निर्माण झाला.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी बुधवारपर्यंत बाजारपेठ बंद ठेवण्याचे पाऊल उचलणे आवश्यक झाले होते. शहरात दिवसेंदिवस गर्दी वाढत होती. व्यापाºयांवर बंदचा परिणाम होईल; मात्र आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेणे आवश्यक होते.- मदनसेठ बगडियाअध्यक्ष, व्यापारी महासंघ रिसोड

 

 

 

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड