विवेकांनद ठाकरे / रिसोड (जि. वाशिम)गत तीन वर्षांंंपासून प्रस्तावित असलेली तहसील कार्यालयाची तीन मजली सुसज्ज मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचा मुहूर्त अखेर निघाला असून, बांधकामाला सुरुवात झाली आहे. इंग्रजकालीन इमारतीत रिसोड तहसील कार्यालयाचा कारभार सुरू आहे. या इमारतीत भौतिक सुविधा पुरेशा नसल्याने अधिकारी-कर्मचार्यांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. रेकॉर्ड ठेवण्यासाठी अद्ययावत कक्ष नाही. ही गैरसोय टाळण्यासाठी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत बांधकामाला सन २0१३ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली होती. बांधकामाकरिता ५ कोटी ८४ लाख ६८ हजार रुपयांची प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली होती; मात्र निधीअभावी बांधकामास प्रत्यक्षपणे सुरुवात झाली नव्हती. याबाबत प्रशासनाने शासनाकडे पाठपुरावा केला. गत महिन्यात निधीची तरतूद झाल्याने, तीन मजली इमारतीच्या कामाचा अखेर मुहूर्त निघाला.
रिसोड तहसील कार्यालय होणार ‘हायटेक’
By admin | Updated: March 5, 2016 02:38 IST