शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींचा राजीनामा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 19:40 IST

रिसोड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गजानन रामकिसन पाचरणे यांनी बाजार समितीच्या सभापती पदाचा राजीनामा बुधवार, ८ नोव्हेंबर रोजी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सादर केला.

ठळक मुद्देउपनिबंधकांनी राजीनामा स्वीकारला वातावरण तापले

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गजानन रामकिसन पाचरणे यांनी बाजार समितीच्या सभापती पदाचा राजीनामा बुधवार, ८ नोव्हेंबर रोजी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सादर केला. यापुर्वी २५ आॅक्टोंबर रोजी उपसभापती विठ्ठलराव आरु यांनी उपसभापती पदाचा राजीनामा दिला होता. आता सभापती  गजानन पाचरणे यांनी राजीनामा दिल्याने बाजार समितीचे सभापती व उपसभापती हीे दोन्ही पदे रिक्त होणार  असुन नव्याने सभापती  व उपसभापती पदावर कोण विराजमान होणार याकडे तालुक्यातील राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.सन २०१५ साली रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी खासदार अनंतराव देशमुख, माजी आमदार विजयराव जाधव, बाबाराव पाटील खडसे, विष्णुपंत भुतेकर, वामनराव देशमुख यांच्या नेतृत्वात महाआघाडी करुन बाजार समितीची निवडणुक लढविल्या गेली. या निवडणुकीत महाआघाडीचे बाजार समितीवर एकतर्फी वर्चस्व निर्माण झाले. अठरा संचालकापैकी सतरा संचालक महाआघाडीचे निवडुन आले तर विरोधी पॅनलमधून एकमेव संचालक डॉ. चंद्रशेखर देशमुख निवडून आले आहेत. निवडणुक प्रक्रियेदरम्यान महाआघाडीत जागा वाटप व निवडणुक निकालाअंती झालेल्या तडजोडीनुसार सभापती व उपसभापती पदावर कोणत्या उमेदवाराने किती कार्यकाळ त्या पदावर विराजमान राहायचे हे महाआघाडीच्या नेत्यांनी ठरविले होते. त्यानुसार सभापती पाचरणे यांनी  सभापती पदाचा राजीनामा  दिला आहे. 

आमचे नेते अनंतराव देशमुख व तालुक्यातील जनतेच्या आशिवार्दाने सन २००२ पासून सभापती, संचालक पदावर आजपर्यंत मला बाजार समितीमध्ये शेतकºयांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. आमच्या नेत्यांनी पार्टीतील नवीन कार्यकर्त्यांना सभापतीची संधी देण्याचे कबूल केल्याने राजीनाम्या संदर्भात नेत्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन केले आहे. नेत्यांना दिलेला शब्द पाळावाच लागतो. यापुढे संचालक म्हणून शेतकºयांच्या हितासाठी काम करत राहणार. - गजानन पाचरणे, सभापती कृ.उ.बा.स, रिसोड 

रिसोड बाजार समितीच्या सभापतीचा राजीनामा बुधवारी प्राप्त झाला आहे. तो मंजूर करुन येत्या १५ दिवसात नविन सभापती -उपसभापतीची निवड करुन कार्यकारीणी स्थापन करण्यासाठी अध्याशी अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक रिसोड यांची नियुक्ती करण्यात येईल. या संदर्भातील आदेश लगेच जारी करणार आहे. - रमेश कटके, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था वाशिम 

टॅग्स :agricultureशेतीMarketबाजार