शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना विषाणू लसीकरण तयारीचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 11:49 IST

Corona vaccine जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. यांनी जिल्ह्यात कोरोना लसीकरणाच्या तयारीचा आढावा वाकाटक सभागृहात घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : कोरोना या जागतिक महामारीवर प्रतिबंध करण्यासाठी स्वदेशी लस उपलब्ध झाली आहे. देशपातळीवर कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी संशोधित केलेली लस प्रभावी ठरणार आहे. १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात होत असताना जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. यांनी जिल्ह्यात कोरोना लसीकरणाच्या तयारीचा आढावा ११ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात घेतला.यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, शिक्षणाधिकारी अंबादास मानकर, जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रतिनिधी डॉ. संदीप हेडाऊ, एस. टी. आगार व्यवस्थापक वाशिम यांचे प्रतिनिधी, युनिसेफ कन्सलटंट डॉ. शैलेश पाटील, आरोग्य विभागाच्या एस. पी. चव्हाण, लसीकरण यंत्र संनियंत्रक संतोष इंगळे व मंगला लाटकर यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. म्हणाले, १६ जानेवारीपासून सुरू होणारी कोरोना लसीकरण मोहीम यशस्वी करा. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि वीज वितरण कंपनीने आरोग्य यंत्रणेशी कोरोना लसीकरणासाठी योग्य समन्वय ठेवून लसीकरण मोहीम यशस्वी करावी. जिल्ह्यात कोरोना चाचणीचे प्रमाण वाढविण्यात यावे. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून नियमितपणे कोरोना चाचणी करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

पॅनकार्ड, आधारकार्ड असणे आवश्यक लसीकरणाच्या वेळी लस घेणाऱ्यांची पोर्टलवर एंट्री करण्यासाठी संबंधित व्यक्तीने पॅनकार्ड आणि आधारकार्ड सोबत आणावे. लसीकरणाच्या ठिकाणी स्वतंत्र लसीकरण खोली, प्रतीक्षा खोली, देखरेख खोली अशी व्यवस्था करण्यात आली आहे. लस दिल्यानंतर लाभार्थ्यास ३० मिनिटे देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसwashimवाशिम