शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात महसूलची ‘आॅनलाईन’ प्रणाली विस्कळित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 16:25 IST

तांत्रिक समस्या उद््भवल्याने गेल्या महिनाभरापासून दस्तावेज मिळणे अशक्य झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह शेतकºयांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मालमत्ता खरेदी-विक्री प्रकरणात ‘आॅनलाईन’ फेरफार घेण्यासह सात-बारा, आठ ‘अ’ हे महत्वाचे दस्तावेज ज्या ‘वेबसाईट’वरून दिल्या जायचे, त्या सर्व ‘वेबसाईट’ बंद करून ‘ईएसडीएस वेब व्हीपीएन लॉग ईन’ ही एकमेव तथा नवी ‘वेबसाईट’ सुरू करण्यात आली. मात्र, त्यातही विविध स्वरूपातील तांत्रिक समस्या उद््भवल्याने गेल्या महिनाभरापासून दस्तावेज मिळणे अशक्य झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह शेतकºयांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.महसूल विभागाकडून तलाठ्यांमार्फत पुर्वी हस्तलिखीत स्वरूपात दिला जाणारी सातबारा, फेरफार, आठ ‘अ’ ही कागदपत्रे आता ‘आॅनलाईन’ पद्धतीने तथा संबंधित अधिकाºयांच्या डिजीटल स्वाक्षरीने देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित नागरिक तथा शेतकºयांना सदर कागदपत्रे मिळविण्याकरिता आता नाईलाजास्ताव सेतू सुविधा केंद्र अथवा संबंधित तलाठ्यांकडील संगणकांमध्ये असलेल्या ‘वेबसाईट’वर विसंबून राहावे लागत आहे. असे असताना यासंदर्भातील अन्य सर्व वेबसाईट शासनाने बंद करून केवळ ‘ईएसडीएस वेब व्हीपीएन लॉग ईन’ ही एकमेव तथा नवी ‘वेबसाईट’ सुरू केली; परंतु त्याबाबत जिल्ह्यातील तलाठ्यांना कुठलेही विशेष प्रशिक्षण देण्यात आले नसून सेतू सुविधा केंद्रांमध्येही ही वेबसाईट हाताळताना अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. जिल्ह्यातील शेतकरी सात-बारा, आठ ‘अ’, फेरफार घेण्यासाठी सेतू सुविधा केंद्रांवर नित्यनेम गर्दी करित आहेत. मात्र, त्यांना ही कागदपत्रे मिळणे कठीण झाले आहे. ही समस्या गेल्या महिनाभरापासून भेडसावत असून याकडे महसूल विभागाने लक्ष पुरवावे, अशी मागणी सर्वच स्तरातून जोर धरत आहे.  तलाठी गुंतले निवडणूकीच्या कामातपुर्वीच्या सर्व ‘वेबसाईट’ बंद करून नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘वेबसाईट’वर कामे करताना सेतू सुविधा केंद्रातील कर्मचाºयांना विविध स्वरूपातील अडचणी जात आहेत. याशिवाय संबंधित नव्या ‘वेबसाईट’वरून दस्तावेज काढणेही अशक्य होत आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील सर्वच तलाठी सद्या लोकसभा निवडणूकीच्या कामकाजात गुंतल्यामुळे अडचणीत भर पडली असून नागरिकांसह शेतकºयांची तारांबळ उडत आहे. शेतकºयांचे आर्थिक व्यवहार खोळंबलेशेतजमिनीचा सात-बारा, आठ ‘अ’, फेरफार आदी दस्तावेजांच्या आधारे चालणारे शेतकºयांचे आर्थिक व्यवहार कागदपत्र मिळणे कठीण झाल्याने खोळंबले आहेत. ग्रामीण भागातील सेतू सुविधा केंद्रावर सकाळपासून रात्री उशिरापर्यंत नागरिकांसह शेतकºयांची तुफान गर्दी होत आहे. मात्र, कागदपत्रांविनाच संबंधितांना परतावे लागत असल्याने त्यांच्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या समस्येमुळे सेतू सुविधा केंद्रांची डोकेदुखी वाढली आहे.

टॅग्स :washimवाशिमRevenue Departmentमहसूल विभाग