श्री पितांबर महाराज संस्थान परिसरातील सभागृहामध्ये शनिवार, दि. १४ ऑगस्ट रोजी आयोजित कोरोना लसीकरण शिबिरात १८ ते ६० वर्षे व त्यावरील वयोगटाच्या सर्व नागरिकांना पहिला व दुसरा डोस देण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच गजानन राऊत, आरोग्य समुदाय अधिकारी डॉ. प्रीती गणुजे, आरोग्यसेविका मोनाली तेलंग, आरोग्यसेवक ढोले, अंगणवाडी सेविका संतोषी तायडे, अंगणवाडी सेविका स्वाती चव्हाण, अंगणवाडी सेविका सुंनदा खिराडे, आशा वर्कर सुषमा जाधव, ग्रामपंचायत कर्मचारी दिलीप नागपुरे, श्रीकृष्ण जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबिराला ग्रामस्तरीय दक्षता समितीचे सदस्य मात्र उपस्थित नव्हते. दरम्यान, लस घेतल्याचे प्रमाणपत्र न आल्यामुळे दुसरा डोस घेणाऱ्यांची तारांबळ उडाली, तर केवळ १०० लसी आणल्याने अनेकांना लसीकरणाअभावी परत जावे लागले.
कोरोना लसीकरण शिबिराला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:41 IST