वाशिम : ग्रामीण भागातील स्वयंसहायता बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तुंचे प्रदर्शन स्थानिक जिल्हा क्रीडा संकुल येथे २४ मार्चपासून सुरू झाले. या प्रदर्शनी स नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे . ग्रामीण भागातील बचत गटाच्या महिलांनी विविध वस्तू विक्रीसाठी ठेवल्या आहेत. सामुहिक प्रयत्नातून महिला बचत गटांनी स्वयंरोजगाराचा मार्ग निवडला असून, बचत गटाच्या स्टॉलला भेट देण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी झाली. या प्रदर्शन मधे गावरान मेवा आकर्षण ठरत आहे . प्रदर्शनाचे आयोजन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने केले आहे.
महिला बचत गटाच्या प्रदर्शनीस प्रतिसाद!
By admin | Updated: March 26, 2017 14:16 IST