यामध्ये धार्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या हनुमंत भजनी मंडळाच्या अध्यक्षा ललिता शिंगणे, तसेच या मंडळाच्या संयोजिका नंदाताई शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. दुर्धर अशा आजारावर मात करून आपल्या परिवारासाठी समाजासाठी कार्य करणाऱ्या सुप्रियाताई शेळके यांचा सत्कार करण्यात आला. तसेच एका अनाथ मुलीला आपली मुलगी म्हणून सांभाळणाऱ्या मस्के यांचा सत्कार करण्यात आला. महिलांसाठी जिम चालविणाऱ्या व सामाजिक कार्य करणाऱ्या चंचल खिराडे यांचा सत्कार करण्यात आला. कामगार कल्याण केंद्राकडून महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी त्यांना व्यवसायाचे मार्गदर्शन करून व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या ध्यास शाखाप्रमुख आश्विनीताई औताडे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रा. मिटकरी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे सीताराम महाराज दबडे, सुरेश सोनवणे, रमेश शिंदे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कामगार कल्याण केंद्राचे संचालक प्रमोद घोडचर यांनी केले व आभार प्रदर्शन ध्यास शाखाप्रमुख अश्विनीताई औताडे यांनी केले. या कार्यक्रमाला ज्योती भुतडा, सोनल दुबे, धनवे, लांडगे, इंगोले, भोयर, गिरे व अनेक महिलांची उपस्थिती होती.
कर्तृत्वान महिलांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:15 IST