शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्त पुरस्कार रक्कमेचा गैरवापर झाल्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 22:37 IST

करंजी : करंजी लहाने या गावाला सन २०१० -२०११ मध्ये तंटामुक्त मोहीमेचा तीन लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला होता. त्या पुरस्कार  रक्कमेचा विनियोग शासनाच्या परिपत्रकानुसार केला नाही. सखोल चौकशी करुन दोषी व्यक्तीवर कारवाई करण्याची तक्रार तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष व सदस्यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे.

ठळक मुद्देसखोल चौकशी करा दोषिंवर कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्ककरंजी : करंजी लहाने या गावाला सन २०१० -२०११ मध्ये तंटामुक्त मोहीमेचा तीन लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला होता. त्या पुरस्कार  रक्कमेचा विनियोग शासनाच्या परिपत्रकानुसार केला नाही. तेव्हा या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करुन दोषी व्यक्तीवर योग्य ती कारवाई करण्याची लेखी तक्रार तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष व सदस्यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे. परंतु यावर अद्यापपर्यंत कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. करंजी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष नारायण निवृत्ती लहाने यांनी  जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम, व पंचायत समिती मालेगाव यांना लेखी देवुन गावाला मिळालेल्या तीन लाख रुपयाचा पुरस्कार शासन परिपत्रकाप्रमाणे केला नाही , तेव्हा सदर  कामाची सखोल चौकशी करुन कारवाईची मागणी केली होती. जवळपास एक महिन्यानंतर सदर तक्रारीची दखल उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेवुन सदर पुरस्कार रक्कमेचा गैरव्यवहार केल्याबाबत सखोल चौकशी करुन आपला अहवाल स्वयंस्पष्ट अभिप्रायासह कार्यालयास सादर करण्याचे पत्र गट विकास अधिकारी, पंचायत समिती, मालेगाव यांना दिले होते. एक महिन्याचा कालावधी उलटुनही गटविकास अधिकारी यांनी अद्यापपर्यंत कोणतीच चौकशी केल्या नसल्याचा आरोप तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष नारायण लहाने यांनी सांगितले . तसेच जिल्हाधिकारी यांना दिलेल्या लेखी पत्रात सर्व गैरव्यवहार हा ग्रामपंचायत सचिव व संबंधीत सरपंच  यांनी केला असे म्हटले आहे. २०१० ते २०१७ या सहा ते सात वर्षात आतापर्यंत तीन सचिव बदलुन गेले आहेत. प्रत्येकांनी पुरस्कार रक्कमेचा गैरव्यवहार केला असल्याचा संशय व्यक्त केला आहे. वारंवार रक्कमेच्या विनियोगाबाबत विचारुनही  माहिती देत नसल्याामुळे तंटामुक्त अध्यक्ष यांनी १८ आॅक्टोंबर रोजी माहितीच्या अधिकारात पत्र देवुन माहिती मागितली आहे. गावकºयांनी गावाला पुरस्कार मिळवुन दिला,मात्र त्या रक्कमेचा योग्य प्रकारे विनियोग केला नाही, त्यामुळे गाव समितीचा उत्साह कमी झाला असुन योग्य न्याय देण्याची मागणी समितीने केले आहे. २८ आॅक्टोंबर  ग्रामपंचायत सचिव यांना भ्रमणध्वनी लावला असता ते कव्हरेज  क्षेत्राच्याबाहेर होते. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत