शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

रिसोड तालुक्यातील विविध शासकीय योजनांत कथित भ्रष्टाचाराची होणार चौकशी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 12:57 IST

रिसोड: तालुक्यात शौचालय, घरकूल, रस्त्याची कामे, तसेच वृक्ष लागवडीसह विविध शासकीय योजनांत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार अन्याय व भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे जिल्हाध्यक्ष सुभाष कुटे यांनी केली आहे.

ठळक मुद्दे शासकीय योजनांत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप अन्याय व भ्रष्टाचार निर्मुलन समितीने केला आहे.जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर करून चौकशी करून यातील दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली होती.संबंधितांकडून अहवाल मागविले जातील आणि त्यांचे निरीक्षण करून योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड: तालुक्यात शौचालय, घरकूल, रस्त्याची कामे, तसेच वृक्ष लागवडीसह विविध शासकीय योजनांत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार अन्याय व भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे जिल्हाध्यक्ष सुभाष कुटे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाºयांकडे निवेदन सादर करून १३ आॅगस्टपर्यंत चौकशी न केल्यास १४ आॅगस्टपासून समितीच्यावतीने उपोषणाचा इशारा दिला होता. याची दखल जिल्हाधिकाºयांनी घेत १० दिवसांत माहिती घेऊन चौकशीचे आश्वासन दिले आहे. रिसोड तालुक्यात घरकूल योजना, रस्त्यांची कामे, वृक्ष लागवड, एलईडी दिवे, रोहयो, शौचालयांसारख्या शासकीय योजनांत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप अन्याय व भ्रष्टाचार निर्मुलन समितीने केला आहे. एकच व्यक्तीला शौचालय अनुदानाचा वेळोवेळी लाभ देणे, शौचालय बांधलेल्या लाभार्थींना या योजनेची रक्कम न मिळणे, पात्र व्यक्तींना घरकुल योजनेपासून वंचित ठेवणे, रस्त्याची कामे निकृष्ट दर्जाची करणे, रोहयोच्या कामगारांना मजुरी न मिळणे, चुकीचे मस्टर सादर करण्याचे प्रकार घडल्याचे या समितीने म्हटले असून, या प्रकरणी समितीचे जिल्हाध्यक्ष सुभाष कुटे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर करून चौकशी करून यातील दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली होती. ही चौकशी १३ आॅगस्टपर्यंत १४ आॅगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला होता. या निवेदनावर सुभाष कुटे, महादेव पुरी, रत्नाबाई शिंदे, ज्ञानेश्वर जाधव, उद्धव बोडखे, विष्णू गिरी, पुरुषोत्तम गिरी, रमेश अवचार, माधवराव अवचार, पांडुरंग खरात, संभाजी नेव्हुल, प्रकाश घाटोळ, आबाराव दळवी, श्रीराम साबळे, गिरीधर देशमुख, माधव जाधव, विठोबा धनगर, सुरेश कांबळे, विष्णू चिभडे, कुसूमताई जाधव, भुजंगराव देशमुख, परमेश्वर बोरकर आदिंची स्वाक्षरी होती. जिल्हाधिकाºयांनी या निवेदनाचा विचार करून निवेदन सादर करणाºया सर्वांना १३ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावले आणि त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली. यावेळी सर्व विभागांतील कथित गैरप्रकाराची चौकशी करण्यासाठी संबंधितांकडून अहवाल मागविले जातील आणि त्यांचे निरीक्षण करून योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन त्यांनी निवेदनकर्त्यांना दिले आहे.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडgovernment schemeसरकारी योजना