शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

भेसळयुक्त बियाण्यांचा अहवाल वरिष्ठांकडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 01:06 IST

मंगरुळपीर: महाबीजकडून घेतलेल्या बियाण्यांत भेसळ असल्याच्या तक्रारी मंगरुळपीर तालुक्यातील चार शेतकर्‍यांनी कृषी विभागाकडे केल्या होत्या. या संदर्भात लोकमतने २ ऑगस्ट रोजी पाठपुरावा केल्यानंतर पंदेकृविचे वरिष्ठ शास्त्रज्ञ, तालुका कृषी अधिकारी, तसेच पंचायत समितीच्या कृषी अधिकार्‍यांनी संबंधित शेताची पाहणी केल्यानंतर भेसळ झाल्याचे त्यांना आढळून आले. याप्रकरणी उपरोक्त चमूच्या पाहणीतील निष्कर्षाचा अहवाल पाठविण्यास विलंब होत असल्याबाबत लोकमतने ६ ऑगस्ट रोजी ‘भेसळयुक्त बियाण्यांचा अहवाल पाठविण्यास विलंब’ या मथळय़ाखाली वृत्त प्रकाशित करून लक्ष वेधले. याची दखल घेत हा अहवाल तातडीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्‍यांकडे पाठविण्यात आला आहे. 

ठळक मुद्देमंगरुळपीर तालुक्यातील प्रकारचार शेतकर्‍यांच्या तक्रारींची दखल बियाण्यांत भेसळ असल्याचा निष्कर्ष 

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर: महाबीजकडून घेतलेल्या बियाण्यांत भेसळ असल्याच्या तक्रारी मंगरुळपीर तालुक्यातील चार शेतकर्‍यांनी कृषी विभागाकडे केल्या होत्या. या संदर्भात लोकमतने २ ऑगस्ट रोजी पाठपुरावा केल्यानंतर पंदेकृविचे वरिष्ठ शास्त्रज्ञ, तालुका कृषी अधिकारी, तसेच पंचायत समितीच्या कृषी अधिकार्‍यांनी संबंधित शेताची पाहणी केल्यानंतर भेसळ झाल्याचे त्यांना आढळून आले. याप्रकरणी उपरोक्त चमूच्या पाहणीतील निष्कर्षाचा अहवाल पाठविण्यास विलंब होत असल्याबाबत लोकमतने ६ ऑगस्ट रोजी ‘भेसळयुक्त बियाण्यांचा अहवाल पाठविण्यास विलंब’ या मथळय़ाखाली वृत्त प्रकाशित करून लक्ष वेधले. याची दखल घेत हा अहवाल तातडीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्‍यांकडे पाठविण्यात आला आहे. मंगरुळपीर तालुक्यातील चांभई येथील शेतकरी गोविंदा भगत यांनी यंदाच्या हंगामात पेरणीसाठी खरेदी -विक्री संघाकडून सोयाबीनचे अनुदानित बियाणे विकत घेतले. त्याची पेरणी केल्यानंतर उगविलेली झाडे पाहिली असता. त्यामध्ये त्यांनी मागणी केलेल्या बियाण्यांच्या झाडांचे प्रमाण अत्यंत कमी आणि इतर वाणाच्या बियाण्यांचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले. त्यांनी यासंदर्भात कृषी विभागाकडे तक्रार करून नुकसान भरपाईची मागणी केली, तसेच लोकमतनेही यासंदर्भात वृत्त प्रकाशित करून कृषी विभागाचे लक्ष वेधले. त्याची कृषी विभागाने दखल घेतली आणि पंदेकृविचे वरिष्ठ शास्त्रज्ञ, तालुका कृषी अधिकारी, तसेच पंचायत समितीच्या कृषी अधिकार्‍यांनी संबंधित शेताची पाहणी केली. त्यावेळी सदर शेतकर्‍याच्या मागणीनुसार, देण्यात आलेल्या महाबीजच्या जेएस-९३0५ या वाणाची झाडे केवळ ३0 टक्के, तर इतर मिश्र वाणाची ७0 टक्के झाडे असल्याचे आढळून आले.  दरम्यान, कृषी विभागाच्या चमूने तालुक्यातील वाढा येथील प्रताप बाबरे, विनोद बाबरे, सुरेखा बाबरे या शेतकर्‍यांच्या शेतातही पाहणी के ली होती. त्यांच्या शेतातही भेसळीचे प्रमाण आढळून आले. यासंदर्भात त्यांच्याकडून वरिष्ठांकडे तातडीने अहवाल पाठविणे अपेक्षित होते; परंतु त्याला विलंब झाला. यासंदर्भात ५ ऑगस्ट रोजी पंचायत समितीच्या कृषी अधिकार्‍यांकडून माहिती घेतल्यानंतर त्यांनी तातडीने अहवाल तयार करून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्‍यांकडे पाठविला.