शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

वसारी-तिवळी रस्त्याची दूरावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:34 IST

----------------- गावठी दारूभट्ट्यांवर पोलिसांचे छापे वाशिम: ग्रामीण भागात सुरू असलेल्या गावठी दारूभट्ट्यांवर पोलिसांनी शनिवारी छापे मारत दारूगाळपाचे साहित्य ...

-----------------

गावठी दारूभट्ट्यांवर पोलिसांचे छापे

वाशिम: ग्रामीण भागात सुरू असलेल्या गावठी दारूभट्ट्यांवर पोलिसांनी शनिवारी छापे मारत दारूगाळपाचे साहित्य आणि सडवा मोहमाच नष्ट केला. गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण परिसरात छुप्या पद्धतीने गावठी दारूचे गाळप करून त्याची विक्री करण्यात येत आहे.

-----------------

पोलीस पाटील यांना प्रोत्साहन भत्ता द्यावा

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर ग्रामीण भागात ‘ग्राऊंड लेवल’वर पोलीस पाटील व सरपंच हे प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी कार्य करीत असून, त्यांचे मानसिक धैर्य वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे त्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्यांनी केली.

-----------------

बँकेसमोर फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा

वाशिम : खरीप हंगामाकरीता पीककर्ज काढण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडत आहे. पीककर्जासाठी फेरफार आवश्यक असल्याने तहसील कार्यालयातही शेतकऱ्यांची एकच गर्दी होत असून, फिजिकल डिस्टंन्सिंगचे पालन होताना दिसून येत नाही.

---------

उकळीपेन येथे ‘एटीएम’ची मागणी

वाशिम: तालुक्यातील तुलनेने अधिक लोकसंख्या असलेल्या तथा हिंगोली-वाशिम या महामार्गावर वसलेल्या उकळीपेन या गावात ‘एटीएम’ची गरज भासत आहे. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष पुरविण्याची मागणी होत आहे.

-------------

उघडण्यावर शौचवारी; कारवाईची मागणी

वाशिम: ग्रामीण भागात शौचालय उभारण्यात आले असले तरी अनेक ठिकाणी आजही नागरिक गावातील रस्त्याच्या दुतर्फा शौचास बसत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने गुडमॉर्निंग पथक पुन्हा सक्रिय करून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

-------------

पीक कर्ज वाटपास गती देण्याची मागणी

वाशिम : खरीप हंगामातील पेरणीसाठी लागणारे शेतीपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज भासत आहे. असे असताना बँकांकडून पीक कर्ज वाटप संथ गतीने सुरू आहे. त्यास गती देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

^^^^^

डिजिटल शेती शाळेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वाशिम: सोयाबीनच्या पेरणीपासून ते काढणीपर्यंत सर्व माहिती शेतकऱ्यांना सहज उपलब्ध व्हावी या हेतूने पानी फाउंडेशनकडून दर आठवड्यात सोयाबीन या पिकासाठी डिजिटल शेतीशाळा सुरू केली. या शेती शाळेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.