शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील ‘त्या’ रुग्णाचा वाशिम येथील नातेवाईक विलगीकरण कक्षात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 15:00 IST

३० मार्च रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय येथील विलगीकरण (क्वारंटाईन) कक्षात आरोग्य विभागाच्या निगराणीखाली ठेवण्यात आले.

ठळक मुद्दे ‘कोरोना’ संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय इतर नातेवाईकांनीही स्वत:हून तपासणी करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णाचा २८ मार्च रोजी मृत्यू झाला. या रुग्णाला आजारी असताना काही दिवसापूर्वी वाशिम येथील त्याचा नातेवाईक भेटण्यासाठी गेला होता. खबरदारीचा उपाय म्हणून वाशिम येथील नातेवाईक इसमाला ३० मार्च रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय येथील विलगीकरण (क्वारंटाईन) कक्षात आरोग्य विभागाच्या निगराणीखाली ठेवण्यात आले.वाशिम जिल्ह्यात अद्यापपर्यंत ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळलेला नाही. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी सुद्धा प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे. बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णाचा २८ मार्च रोजी मृत्यू झाला. या रुग्णाला आजारी असताना तीन-चार दिवसापूर्वी वाशिम येथील काही नातेवाईक भेटण्यासाठी गेले होते. तसेच सदर रुग्णाच्या अंत्यविधीला सुध्दा काही नातेवाईक उपस्थित असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून वाशिम येथील गंगू प्लॉट, बागवान पुरा, आरिफ नगर येथील डॉ. जिब्राल हॉस्पिटल परिसरातील एका नातेवाईकाला जिल्हा सामान्य रुग्णालय येथील विलगीकरण (क्वारंटाईन) कक्षात आरोग्य विभागाच्या निगराणीखाली ठेवण्यात आले. बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत व्यक्तीला आजारी असताना भेटण्यासाठी गेलेल्या अथवा त्याच्या अंत्यविधीला उपस्थित राहिलेल्या वाशिम शहरातील व जिल्ह्यातील इतर नातेवाइकांनी सुद्धा स्वत:हून जिल्हा सामान्य रुग्णालयात संपर्क साधून आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी. त्यांची योग्य काळजी घेतली जाईल. तसेच या नातेवाईकांबाबत माहिती असल्यास नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला कळवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत  ३० मार्च रोजी करण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमbuldhanaबुलडाणाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस