शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

दुकाने आणि आस्थापनांची नोंदणी अनिवार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 12:46 IST

आता दुकाने आणि आस्थापनांची नोंदणी करणे अनिवार्य असून, नोंदणी नसल्यास संबंधितांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

नोंदणी नसल्यास कारवाई : आपले सरकार पोर्टलवर अर्ज करण्याची सुविधालोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्य सरकारने महाराष्ट्र दुकाने व संस्था अधिनियम १९४८ हा अधिनियम निरस्त करुन नविन दुकाने व आस्थापना अधिनियम २०१७ अंमलात आणला आहे. त्यामुळे आता दुकाने आणि आस्थापनांची नोंदणी करणे अनिवार्य असून, नोंदणी नसल्यास संबंधितांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे, असा इशारा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाने बुधवारी दिला.शहरातील एमआयडीसी भागातील व ग्रामीण भागातील दुकाने, निवासी हॉटेल, धाबे, उपहारगृहे, खाद्यगृहे, सिनेमागृह किंवा सार्वजनिक मनोरंजनाची जागा, आस्थापना कोणताही उद्योग, उत्पादनकार्य किंवा बँकिंग, विमा रोखे व भाग (शेअर्स), दलाली किंवा उत्पन्न विनिमय या बाबतचा व्यवसाय किंवा पेशा अथवा कोणताही धंदा किंवा उत्पादनकार्य यांच्याशी संबंधित किंवा त्यास अनुषंगीक असे कोणतेही काम करणारी आस्थापना, वैद्यक व्यवसायी यामध्ये दवाखाना, चिकित्सालय, प्रसुतीगृह वास्तूशास्त्राच्या, अभियंत्याच्या, लेखापालाच्या कर संमतकाच्या तांत्रिक किंवा व्यवसायिक सल्लागाराच्या आस्थापना, सोसायटी व तिच्याशी अनुषंगीक  असलेला कोणताही व्यवसाय, धंदा तसेच ज्यांना कारखाने अधिनियम १९४८ च्या तरतूदी लागू होत नाहीत त्या सर्व आस्थापनांचा समावेश नव्या अधिनियमात करण्यात आला आहे.उपरोक्त आस्थापना ज्यांच्याकडे १० पेक्षा कमी कर्मचारी काम करत आहेत अशा आस्थापना मालकांना १९ डिसेंबर २०१७ या अधिनिमाच्या प्रारंभांच्या दिनांकापासून किंवा आस्थापनेने धंदा सुरु केलेल्या दिनांकापासून ६० दिवसाच्या आत विहीत नमुन्यात ‘आपले सरकार’ या पोर्टलवर आॅनलाईन अर्ज करुन सुचना पत्राची पावती प्राप्त करुन घ्यावी लागणार आहे तसेच ज्या आस्थापनेत १० किंवा त्यापेक्षा जास्त कामगार काम करतात त्या आस्थापना मालकांनी अधिनियमातील कलम ६ च्या तरतूदीनुसार नोंदणी करुन नोंदणी प्रमापणपत्र प्राप्त करुन घेणे बंधनकारक आहे.जिल्हयातील सर्व व्यवसायिकांनी सदर अधिनियमांतर्गत आपल्या आस्थापनेची रितसर नोंदणी करुन सुचनापत्राची पावती अथवा नोंदणी प्रमाणपत्र नि:शुल्क प्राप्त करुन घ्यावे. सदर अर्ज संबंधित आस्थापनाधारक स्वत: आॅनलाईन किंवा ग्राहकसेवा केंद्रामध्ये (सेतू केंद्रामध्ये) भरु शकतो, असे सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

टॅग्स :washimवाशिमGovernmentसरकार