शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध आईच्या पालनपोषणास मुलांचा नकार; हेल्पलाइनच्या दणक्याने लगेच होकार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 08:35 IST

आईचे पालन पाेषणही करण्यास त्यांनी नकार दिला.

वाशिम :

कोरोनामुळे वडिलांचे निधन झाले. ७२ वर्षीय आईची जगण्याची धडपड सुरू असतानाच  मुलांनी आईला विश्वासात न घेता वडिलांची शेती स्वत:च्या नावावर करून घेतली. आईचे पालन पाेषणही करण्यास त्यांनी नकार दिला.  ‘१४५६७’ या टोल फ्री क्रमांकाच्या हेल्पलाइनवर वृद्धेने फाेन करून अन्यायाचा पाढा वाचला. अखेर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनात वृद्ध आईला न्याय मिळाला. झाकलवाडी येथील ७२ वर्षीय वृद्ध आईने हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधला. कोरोनामुळे पतीचे निधन झाले आणि तिन्ही मुलांनी शेती स्वत:च्या नावावर करीत पालनपोषण करण्यास नकार दिल्याची व्यथा या त्यांनी हेल्पलाइनवर व्यक्त केली. हेल्पलाइनचे क्षेत्रीय प्रतिसाद अधिकारी ज्ञानेश्वर टेकाळे यांनी वाशिमचे उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत यांच्याकडे यासंदर्भात प्रकरण दाखल केले. तीन सुनावणीनंतर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत आईच्या प्रकरणात सत्यता आढळून आली. तिन्ही मुलांनी प्रत्येकी दोन हजार रुपये असा एकूण सहा हजार रुपये दरमहा ५ तारखेपूर्वी आईस निर्वाह भत्ता द्यावा, असा आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिला. आतापर्यंत २७ प्रकरणांत वृद्धांना न्याय मिळवून दिल्याचे टेकाळे यांनी मंगळवारी सांगितले.

कशासंदर्भात करता येईल कॉल?  आरोग्य जागरूकता, निदान, उपचार, निवारा, वृद्धाश्रम, जीवन व्यवस्थापन आणि दस्तऐवजीकरण, पेन्शनसंबंधीची समस्या जाणवत असल्यास, कायदेविषयक माहिती हवी असेल, घरात चुकीची वागणूक मिळत असेल किंवा इतरही मदतीची गरज असल्यास ज्येष्ठ नागरिक संपर्क साधू शकतात.