शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादनाच्या देय रकमेतून पीककर्जासह व्याजाचीही कपात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 01:49 IST

वाशिम :  जिल्ह्यातील ५४ गावांमधून जात असलेल्या नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गासाठी आतापर्यंत ७२ टक्के भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली असून, सरळ खरेदी पद्धतीने मोबदलाही अदा केला जात आहे; मात्र ही रक्कम संबंधितांच्या बँक खात्यात जमा करताना त्यातून थकीत पीककर्जाच्या रकमेसह त्यावरील मार्चअखेरपर्यंत होणारी व्याजाची रक्कमही कापून घेतली जात आहे. याबाबत शेतक-यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, प्रशासनाकडून मात्र योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याची ओरड शेतक-यांमधून होत आहे. 

ठळक मुद्देशेतक-यांमध्ये संभ्रम समृद्धी महामार्गासाठी ७२ टक्के भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण

सुनील काकडे । लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  जिल्ह्यातील ५४ गावांमधून जात असलेल्या नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गासाठी आतापर्यंत ७२ टक्के भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली असून, सरळ खरेदी पद्धतीने मोबदलाही अदा केला जात आहे; मात्र ही रक्कम संबंधितांच्या बँक खात्यात जमा करताना त्यातून थकीत पीककर्जाच्या रकमेसह त्यावरील मार्चअखेरपर्यंत होणारी व्याजाची रक्कमही कापून घेतली जात आहे. याबाबत शेतक-यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, प्रशासनाकडून मात्र योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याची ओरड शेतक-यांमधून होत आहे. जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील ५४ गावांमधून जात असलेल्या समृद्धी महामार्गासाठी ९८८.२५ हेक्टर जमीन संपादित करावयाची आहे. त्यापैकी आजपर्यंत ७०० हेक्टरच्या आसपास जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, संबंधित पात्र शेतकºयांच्या सुमारे ११००  खरेदी करून ‘रेडी रेकनर’ नुसार त्यांना मोबदला वाटप करण्यात आला आहे. दरम्यान, सदर मोबदला शेतक-यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जात असताना त्यातून शेतक-यांकडे असलेली पीककर्जाची थकबाकी कापून घेतली जात आहे. याबाबत शेतक-यांची कुठलीच नाराजी नाही; परंतु पीककर्जावरील व्याजही आधीच देय रकमेतून कपात केले जात असल्याने त्यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, यासंदर्भातील कैफियत नेमकी कुणाकडे मांडावी, याबाबत अनभिज्ञ असलेल्या शेतक-यांमध्ये यामुळेच मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

समृद्धी महामार्गासाठी जमिनी देण्यास शेतकºयांचा आता कुठलाच विरोध राहिलेला नाही. सरळ खरेदी पद्धतीने योग्य मोबदलाही मिळत आहे; मात्र संपादित केलेल्या जमिनीच्या रकमेतून पीककर्जाच्या रकमेसह व्याजाची रक्कम कपात करणे चुकीचे आहे. यामुळे काही शेतकºयांमध्ये संताप व्यक्त होत आहे.  गंगादीप राऊतशेतकरी संघर्ष समिती, वनोजा

जमीन संपादित करायची झाल्यास सातबारावर कुठलाही बोझा नसणे आवश्यक आहे. त्यामुळेच शेतकºयांना मिळणाºया मोबदल्यातून पीककर्जाची रक्कम जमा केली जात आहे. तसेच कर्जमाफीची काही प्रकरणे अद्याप प्रलंबित असून, ही प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंतचे व्याजही जमा ठेवले जात आहे. फरकाची रक्कम संबंधित शेतकºयांना परत केली जाईल.- सुनील माळीक्षेत्रीय अधिकारी तथा प्रशासक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ

सर्व बँकांच्या प्रतिनिधींची मंगळवारी बैठक!समृद्धी महामार्गासाठी संपादित केल्या जाणा-या जमीनधारकांकडे असलेले कर्ज आणि त्यावरील व्याजाबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी येत्या मंगळवारी बँक प्रतिनिधींच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात हा विषय मार्गी लागेल, असे क्षेत्रीय अधिकारी सुनील माळी यांनी सांगितले. 

टॅग्स :washimवाशिम