वाशिम : शासकीय, निमशासकीय यासह इतर कार्यालय व संस्थांच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी माहितीचा अधिकार पारित करण्यात आला. या अधिकारामुळे गैरप्रकाराला निश्चितच आळा बसतो. मात्र, या अधिकाराचाच दुरु पयोग करून माया गोळा करण्याचा गोरखधंदा काहींनी सुरू केल्याने याला आळा बसणे गरजेचे झाले आहे. कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने माहितीचा अधिकाराबाबत कायदा केला आहे. यानुसार काही महत्त्वपूर्ण गुप्त माहितीचा अ पवाद वगळून शासकीय व निमशासकीय, खाजगी संस्थांमधील माहिती मागण्याचा अधिकारी प्रत्येक नागरिकाला मिळाला आहे. आपल्यावरील अन्याय दूर करण्यासाठी, गैरप्रकार रोखण्यासाठी, निधीचा वापर योग्य ठिकाणी व योग्य प्रमाणात होण्यासाठी माहितीचा अधिकार फार प्रभावी आहे. मात्र आजमितीला हा अधिकार हा अनेकांचे पैसे कमविण्याचे साधन बनत आहे. जिल्हा परिषद, पुरवठा विभाग, तहसील कार्यालय, पंचायत समिती, बांधकाम विभाग, क्रीडा विभाग, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, भूमि अभिलेख कार्यालय आदी कार्यालयात माहितीच्या अधिकारांतर्गत अर्ज सादर करण्याचे प्रमाण वाढत आहे. माहितीच्या अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीवर पुढे काहीच कार्यवाही होत नाही, असे चित्र पाहावयास मिळत आहे.
माहिती अधिकाराचा उपयोग कमी; दुरुपयोगच वाढला
By admin | Updated: November 16, 2014 23:47 IST