शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अवैध गौण खनिजप्रकरणी ६.५० लाखाचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 14:23 IST

रिसोड (वाशिम) : रिसोड तालुक्यात अवैध रेती, गौण खनिज वाहतूक फोफावली असून, महसूल प्रशासनाने एप्रिल ते सप्टेंबर महिन्यात राबविलेल्या मोहिमेत १३ प्रकरणांत ६.५७ लाखांचा दंड वसूल केला आहे.

- निनाद देशमुखलोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : रिसोड तालुक्यात अवैध रेती, गौण खनिज वाहतूक फोफावली असून, महसूल प्रशासनाने एप्रिल ते सप्टेंबर महिन्यात राबविलेल्या मोहिमेत १३ प्रकरणांत ६.५७ लाखांचा दंड वसूल केला आहे.गौण खनिजाची वाहतूक करण्यापूर्वी संबंधितांनी आवश्यक ते परवाने तसेच शासकीय नियमांची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. रिसोड तालुक्यातील काही नदीपात्रातून तसेच बुलडाणा जिल्हा व मराठवाड्यातील काही रेतीघाटांमधून रिसोडमार्गे अन्यत्र सर्रास रेती वाहतूक केली जाते. दोन ते तीन ब्रास रेती रॉयल्टीच्या पावतीवर जादा ब्रास रेतीची वाहतूक करणे, रॉयल्टीच्या पावत्या नसतानाही रेतीची वाहतूक रात्री १० ते पहाटे ५ या दरम्यान रिसोडमार्गे केली जाते. अवैध रेती वाहतूकीवर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टिकोनातून रिसोड तहसिल प्रशासनाने एप्रिल ते सप्टेंबर २०१८ या दरम्यान राबविलेल्या मोहिमेत १३ वाहने दोषी आढळून आली. या सर्वांकडून सहा लाख ५७ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, आता रॉयल्टी पावतीचा मुदत संपलेली असतानाही रिसोड तालुक्यातून अन्यत्र रेतीची वाहतूक रात्रीच्या सुमारास होत असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देणे अपेक्षीत आहे.

ग्रामस्तरावर दक्षता समित्या गठीतअवैध रेती व गौण खनिज वाहतूकीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ग्रामस्तरावर गौण खनिज दक्षता समित्यांचे गठण करण्यात आले आहे. या समितीचे अध्यक्ष सरपंच असून ते दर १५ दिवसाने तहसिलदारांना गौण खनिज उत्खनन व वाहतूकसंदर्भात माहिती देतात. ग्रामस्तरीय दक्षता समितीकडून योग्य ते सहकार्य मिळाले तर तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीला आळा बसण्यास फारसा वेळ लागणार नाही.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड