शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात २० पैकी ९ रेशन दुकानांसाठी प्रस्ताव प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 12:57 IST

वाशिम : विविध कारणांमुळे जिल्हयातील २० गावांतील रेशन दुकाने रिक्त झाले असून, सदर रेशन दुकाने सुरु करण्यासाठी पुरवठा विभागाने प्रस्ताव मागविले होते

ठळक मुद्दे विहित मुदतीत केवळ ९ गावांसाठी प्रस्ताव आले.उर्वरीत ११ गावांतील रेशन दुकानासाठी पुन्हा अर्ज मागविण्यात येणार आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : विविध कारणांमुळे जिल्हयातील २० गावांतील रेशन दुकाने रिक्त झाले असून, सदर रेशन दुकाने सुरु करण्यासाठी पुरवठा विभागाने प्रस्ताव मागविले होते. विहित मुदतीत केवळ ९ गावांसाठी प्रस्ताव आले असून, उर्वरीत ११ गावांतील रेशन दुकानासाठी पुन्हा अर्ज मागविण्यात येणार आहेत. विविध कारणांमुळे जिल्ह्यातील एकूण २० गावांतील रेशन दुकानांचा परवाना रद्द झाला आहे. यामध्ये वाशिम तालुक्यातील कुंभारखेडा, धारकाटा, तांदळी शेवई व उमरा(कापसे), मालेगांव तालुक्यातील कुरळा, झोडगा (खुर्द), वरदळी (खुर्द), किन्हीराजा, धमधमी, पांगरखेडा, रिसोड तालुक्यातील  तपोवन, जायखेडा, पांचाबा, मंगरुळपीर तालुक्यातील एकांबा, बालदेव, मोतसावंगा, शेलगाव, स्वासीन, कारंजा तालुक्यातील पिंपळगांव (खुर्द), व मानोरा तालुक्यातील जामदरा घोटी या गावांचा समावेश आहे.उपरोक्त २० गावांत नव्याने रेशन दुकान सुरु करण्यासाठी ग्रामपंचायत वा तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचतगट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियम कायद्यांतर्गत नोदंणी झालेली संस्था, महिला स्वयं सहाय्यता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्थांकडून सप्टेंबर महिन्यात जिल्हा पुरवठा विभागाने प्रस्ताव मागविले होते. यापैकी केवळ नऊ गावांतून प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. या प्रस्तावांची छानणी करण्यात आली असून, समितीच्या बैठकीत मंजूरीसाठी सदर प्रस्ताव ठेवले जाणार आहेत. समितीच्या मंजूरीनंतर ९ गावांत रेशन दुकान सुरू होणार आहे.दरम्यान, उर्वरीत ११ गावांसाठी एकही प्रस्ताव प्राप्त झाला नाही. या ११ गावांत रेशन दुकान सुरू करण्यासाठी पुन्हा जाहिरनामा काढणे आणि प्रस्ताव मागविणे अशी कार्यवाही करण्यात येणार आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :washimवाशिम