शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अंतिम यादी प्रकाशनापूर्वी मतदार यादीचे वाचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 16:22 IST

वाशिम:  मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यापूर्वी जिल्ह्यात मतदार यादीचे वाचन करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम:  मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यापूर्वी जिल्ह्यात मतदार यादीचे वाचन करण्यात येत आहे. बीएलओमार्फत ही प्रक्रिया राबविण्यात येत असून, या अंतर्गत दुरुस्तीसाठी आवश्यक नोंदी त्यांच्याकडून घेण्यात येत आहेत.निवडणूक आयोगाच्या निदेर्शाप्रमाणे १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्ह्यात १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत मतदार नोंदणीची मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवीन मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे, मतदारांच्या नावात बदल, पत्त्यात दुरुस्ती, स्थलांतरासंबंधी मतदारांकडून नमुना अर्ज भरून घेणे तसेच मयत मतदारांची नावे यादीतून वगळण्याचे काम करण्यात आले. जिल्ह्यातील वाशिम - मंगरुळपीर, रिसोड -मालेगाव आणि कारंजा -मानोरा या तिन्ही विधानसभा मतदारसंघात १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत ३७ हजार ८५५ नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. नवीन मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी संबंधित मतदारांकडून अर्ज स्वीकारण्यात आले. आता अंतिम मतदार यादी प्रकाशित करण्याची तयारी करण्यात येत असून, या अंतर्गत मतदार यादीचे वाचन जिल्हाभरात करण्यात येत आहे. विविध ग्रामपंचायत कार्यालयांतही मतदार यादीचे वाचन ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात येत असून, या प्रक्रियेदरम्यान मतदारांकडून पत्ता, नाव, छायाचित्रातील चुकांसह इतर बदलाच्या नोंदी बीएलओमार्फत घेण्यात येत आहेत. दरम्यान, विशेष पुनरिक्षण मोहिमेदरम्यान नव्याने नोंदणी झालेल्या मतदारांनंतर जिल्ह्यातील मतदारांची संख्या ९३८२०२ झाली असून, येत्या ११ डिसेंबर रोजी जिल्ह्याची अंतिम यादी प्रकाशित होणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकाºयांकडून देण्यात आली आहे.

टॅग्स :washimवाशिम