शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव येथील वाचन विकास प्रशिक्षणला शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 16:13 IST

 मालेगाव :- येथील अकोला मार्गावरील आयएमए हॉल येथे पार पडलेल्या वाचन विकास प्रशिक्षणात जिल्हाभरातील शेकडो शिक्षकांनी सहभागी होऊन विद्यार्थ्यांमधील वाचन विकसीत करण्याबाबतचे मार्गदर्शन घेतले.  जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण विकास प्रशिक्षण तसेच व शिक्षा अभियान पंचायत समिती मालेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. शिक्षणामध्ये आनंददायी वाचन शिक्षण पूरक कृती ...

ठळक मुद्दे जिल्हाभरातील शेकडो शिक्षकांनी सहभागी होऊन विद्यार्थ्यांमधील वाचन विकसीत करण्याबाबतचे मार्गदर्शन घेतले.   चित्र वाचन, चित्र गाडी मॅचिंग टेस्ट, शब्द चक्र, अक्षर गट, वचन पाठ आदि अनुभव देण्यात आले. या प्रशिक्षणात वाचन क्षमता चे टप्पे त्यामागील शिक्षकाची मार्गदर्शकचि भूमिका याबाबत संकल्पना स्पष्ट केल्या गेली.

 

मालेगाव :- येथील अकोला मार्गावरील आयएमए हॉल येथे पार पडलेल्या वाचन विकास प्रशिक्षणात जिल्हाभरातील शेकडो शिक्षकांनी सहभागी होऊन विद्यार्थ्यांमधील वाचन विकसीत करण्याबाबतचे मार्गदर्शन घेतले.  

जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण विकास प्रशिक्षण तसेच व शिक्षा अभियान पंचायत समिती मालेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. शिक्षणामध्ये आनंददायी वाचन शिक्षण पूरक कृती आणि विद्यार्थ्याच्या वाचनातील मागोवा घेऊन उत्कृष्ट श्रवण विकसित करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.  भावविश्वातील अनुभव विद्यार्थ्यांना दिले, तर त्यांचे श्रवण वाचन मनन चिंतन अतिशय योग्य प्रकारे होते. पर्यायाने भाषण संभाषणही चांगल्या प्रकारे होते. या प्रशिक्षण कार्यक्रमात वाचनाचे टप्पे शिकवताना कृतियुक्त अध्यापन करुन मार्गदर्शन करण्यात आले. चित्र वाचन, चित्र गाडी मॅचिंग टेस्ट, शब्द चक्र, अक्षर गट, वचन पाठ आदि अनुभव देण्यात आले. कृतियुक्त गाणी, बड़बड़ गीते, चित्र शब्द वाचन आदिंबाबतही आनंदायी मार्गदर्शन करण्यात आले. संपूर्ण राज्यात आतापर्यंत अनेक शाळा प्रगत झाल्या आहेत; परंतु  मुलांची वाचन क्षमता शंभर टक्के विकसित झाली नाही. ही क्षमता विकसित करण्यासाठी तसेच वाचन विकास टप्पे आणि त्यामागील विचार समजून घेऊन वाचनाचे क्षमता वाढण्यासाठी या राज्यव्यापी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणात वाचन क्षमता चे टप्पे त्यामागील शिक्षकाची मार्गदर्शकचि भूमिका याबाबत संकल्पना स्पष्ट केल्या गेली. प्रशिक्षणाला जेष्ठ अधिव्याख्याता अरुन सांगोलकर, अमोल डोंगाळे, राजेश गवई क्रांति कुलकर्णी यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले, तसेच तज्ञ मार्गदर्शक म्हणून विषयतज्ञ भास्कर कोहळे, मनोहर बाहे, संदीप दसपुते, बालाजी पाचपुते आदिंनीही मार्गदर्शन केले. प्रशिक्षण समन्वयक म्हणून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एस. वाय. पाटील, राज्य समन्वयक नरेश नाखले, किशोर वैष्णव, तसेच प्रमुख नियंत्रक गटशिक्षणाधिकारी राजेंद्र शिंदे यांनीसुद्धा या प्रशिक्षण कार्यक्रमाला भेट देऊन मार्गदर्शन केले.

टॅग्स :washimवाशिम