शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शिधापत्रिकाधारकांना तीन वर्षांपासून वाटपच नाही

By admin | Updated: December 30, 2014 00:39 IST

पुरवठा विभाग अनभिज्ञ: स्वस्तधान्य दुकानदारांची मनमानी.

मानोरा (वाशिम): तालुक्यातील फुलउमरी येथे काही लाभार्थींना जून २0११ मध्ये शिधापत्रिका देण्यात आल्या; परंतु साडेतीन वर्षांचा कालावधी उलटला तरी संबंधित स्वस्तधान्य दुकानदाराने या लाभार्थींना त्यांच्या हक्काचे शिधावाटप एकदाही केलेले नाही. गोरगरिबांना पोटभर अन्न खायला मिळावे म्हणून शासन विविध योजना राबवित आहे. दारिद्रय़ रेषेखालील लोकांसाठी अन्न सुरक्षा योजनाही शासनाकडून अमलात आणण्यात आली आहे. या योजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्रशासनातील संबंधित अधिकार्‍यांना देण्यातही आले आहेत; परंतु त्या योजनांची प्रभावी अंमलबजावणीच होत नसल्यामुळे गोरगरीब जनता त्यांच्या हक्कापासून वंचित होत आहे. याचे जिवंत उदाहरण मानोरा तालुक्यातील फुलउमरी येथे पाहायला मिळते. या छोट्याशा गावातील काही ग्रामस्थांना २0१३ च्या जून महिन्यात पुरवठा विभागाकडून शिधापत्रिका देण्यात आल्या होत्या. जयसिंग रुपसिंग चव्हाण यांच्याकडे फुलउमरीचे शिधावाटप आहे, अर्थात या गावचे स्वस्तधान्य दुकानदार ते आहेत. त्यामुळे या दुकानातून सदर शिधापत्रिंकाधारकांना त्यांच्या हक्काचे शिधावाटप नियमितपणे व्हायला हवे; परंतु तसे होत नाही. या ठिकाणच्या काही लाभार्थींना गत साडेतीन वर्षात एकदाही त्यांच्याकडून शिधावाटपच झाले नसल्याची तक्रार शिधापत्रिंकाधारकांनीच केली आहे. काही शिधापत्रिकांना वाटप करण्यात येते; परंतु तेसुद्धा नियमाप्रमाणे करण्यात येत नसल्याचीही तक्रार त्यांच्याकडून करण्यात येत आहे. दर महिन्याला शासनाकडून मिळणार्‍या धान्याचे वाटप करण्यासाठी येथील स्वस्तधान्य दुकानदाराला त्याच्या क्षेत्रातील शिधापत्रिकांनुसार पुरवठा करण्यात येतो. त्यानंतर लाभार्थी हक्काचे शिधावाटप घेण्यासाठी त्याच्याकडे जातात; परंतु तो उडवाउडवीची उत्तरे देऊन या लाभार्थींची बोळवण करतो. संबंधित विभागाकडून तुमच्या वाट्याचा मालच मिळाला नाही, अशी उत्तरे तो देतो. त्याच्या मनमानी कारभाराला लाभार्थी कंटाळून गेले असून, या स्वस्तधान्य दुकानदाराचा परवानाच रद्द होण्याची मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी तहसीलदारांना निवेदनही दिले आहे.