कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ. सुभाष गवई होते. विद्याशाखा प्रमुख डाॅ. कैलास यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य गवई म्हणाले, भारतीय ग्रंथालय व माहितीशास्त्राला नवी ओळख निर्माण करून देण्याचे श्रेय रंगनाथन यांना जाते. त्यांनी भारतीय ग्रंथालयाला शास्त्र म्हणून समृद्ध केले. त्यामुळेच त्यांना भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक म्हणून संबोधले जाते, अशी माहिती त्यांनी दिली. ग्रंथपाल उमेश कुऱ्हाडे यांनी प्रास्ताविक केले. संचालन हेमेंद्र बाळे यांनी केले, तर मयूर वडते यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डाॅ. कैलास गायकवाड, डाॅ. अशोक जाधव, डाॅ. योगेश पोहोकार, प्रा. पराग गावंडे, राजेश अढाव, उमेश देशमुख, प्रवीण डफडे, बाळकृष्ण खानबरड, राजू राउत, प्रकाश लोखंडे, अरुण ईसळ, सुनील राजगुरे यांनी परिश्रम घेतले.