शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

वाशिम जिल्ह्यात ९० पेक्षा अधिक मतदान केंद्रांवर ‘रॅम्प’ची व्यवस्था !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 15:30 IST

वाशिम : ११ एप्रिल रोजी मतदान होणाºया यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी जिल्ह्यात १६६१ दिव्यांग मतदारांची नोंद असून, ९० पेक्षा अधिक मतदान केंद्रांवर ‘रॅम्प’ची व्यवस्था करण्यात आली आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ११ एप्रिल रोजी मतदान होणाºया यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी जिल्ह्यात १६६१ दिव्यांग मतदारांची नोंद असून, ९० पेक्षा अधिक मतदान केंद्रांवर ‘रॅम्प’ची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर प्रवेश करून निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सर्व साहित्य सहजतेने हाताळता यावे व दिव्यांग मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करणे, दिव्यांग मतदारांमध्ये जनजागृती, मार्गदर्शन, मतदान केंद्रांवर कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी समाजकल्याण विभागाला दिल्या होत्या. या सूचनांच्या अनुषंगाने समाजकल्याण विभागाने जय्यत तयारी केली असून, ११ एप्रिल रोजी होणाºया मतदानासाठी १६६१ दिव्यांग मतदारांची नोंदणी झाली आहे. मतदान केंद्रांत कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रवेश करण्यासाठी ९० पेक्षा अधिक मतदान केंद्रांवर रॅम्पची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यातील समाजकल्याण विभागाच्या अधिनस्त असलेल्या दिव्यांगाच्या विशेष शाळेतील १०० पेक्षा जास्त कर्मचाºयांची १३१ मतदान केंद्रांवर नियुक्ती करण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करणे, त्यांना सुखरूप मतदान केंद्रांवर आणणे आणि मतदान करून घरी सुखरूपपणे सोडणे यासाठी सदर कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही. त्यांना तत्काळ मतदान केंद्रांवर प्रवेश देण्यात येईल, असे निर्देश जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर देण्यात आलेले आहेत. तसेच प्रत्येक मतदान केंद्रांवर विशेष वाहनाची व्यवस्था जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर, सहायक आयुक्त माया केदार यांच्यासह जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाचे सर्व कर्मचारी परिश्रम घेत आहेत. दिव्यांगांनी १०० टक्के मतदान करावे, असे आवाहनही प्रशासनाने केले.

टॅग्स :washimवाशिमyavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिमLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक