शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

रमाबाई आंबेडकर कॉलनी विविध समस्यांच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:44 IST

येथील गट सर्व्हे क्र. १३५ मध्ये अतिक्रमण जागेवर गेल्या १५ ते १६ वर्षांपासून ३५ घरांची वस्ती आहे. ...

येथील गट सर्व्हे क्र. १३५ मध्ये अतिक्रमण जागेवर गेल्या १५ ते १६ वर्षांपासून ३५ घरांची वस्ती आहे. यात जवळपास ६० ते ७० रहिवासी राहत आहेत. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून येथील रहिवाशांनी या अतिक्रमण जागेवर लेआउट पाडून त्या जागा आमच्या नावे करण्यात याव्यात, येण्या-जाण्यासाठी रस्त्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. परंतु, अद्यापपर्यंत त्यांना कुठलाही प्रतिसाद शासनाकडून मिळाला नसल्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत ग्रामपंचायत प्रशासन, तहसीलदार धीरज मांजरे यांना निवेदन दिले आहे.

याठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांना एक किमी अंतरावरून पिण्यासाठी पाणी आणावे लागते. त्यामुळे येथे हातपंपाची व्यवस्था करावी, अशी मागणी येथील रहिवाशांकडून केली जात आहे. ही वस्ती गावाबाहेर असून, या वस्तीच्या आजूबाजूने मोठ्या प्रमाणात झाडेझुडपी वाढली आहे. त्यामुळे विंचू, साप, गोम यांची भीती येथे राहणाऱ्या नागरिकांना वाटत आहे. याविषयी अनेकदा ग्रामपंचायत धनज बु येथील सरपंच, तहसीलदार कारंजा, उपविभागीय अधिकारी कारंजा, गटविकास अधिकारी कारंजा, पंचायत समिती सभापती कारंजा, जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम तसेच आमदार पाटणी यांना निवेदन दिले आहे. याकडे संबंधितांनी त्वरित लक्ष देऊन आम्हाला न्याय द्यावा, अशी माणगी येथील रहिवासी करत आहेत.

....................

आम्हा अतिक्रमणधारकांना ही जागा नावावर करून द्यावी तसेच येथे रस्ता, पिण्याच्या पाण्याची सोय, रस्त्यावर लाइट या आमच्या समस्या असून, त्या पूर्ण करण्यात याव्यात, अशी मागणी अनेकदा शासनाकडे करूनसुद्धा आम्हाला अद्यापपर्यंत कुठलाही न्याय मिळालेला नाही.

- विशाल अघमे,

रहिवासी दलितवस्ती रमाबाई आंबेडकर कॉलनी, धनज बु.

-------------

गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही अनेक समस्यांनी त्रस्त झालो असून, शासनाकडे आमच्या या समस्यांविषयी कित्येकदा माहिती देऊनसुद्धा आम्हाला न्याय मिळाला नाही.

- विपुल घणघावकार

राहिवासी, दलितवस्ती रमाबाई आंबेडकर कॉलनी, धनज बु.