शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सीएए, एनआरसी समर्थनार्थ रिसोडमध्ये ‘हुंकार रॅली’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 15:44 IST

राष्ट्रीय सुरक्षा मंचच्यावतीने मंगळवार २८ जानेवारी रोजी रिसोड शहरातील मुख्य मार्गावरून ‘हुंकार रॅली’ काढण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरी नोंदणी (एनआरसी) च्या समर्थनार्थ राष्ट्रीय सुरक्षा मंचच्यावतीने मंगळवार २८ जानेवारी रोजी रिसोड शहरातील मुख्य मार्गावरून ‘हुंकार रॅली’ काढण्यात आली. या रॅलीत हजारो नागरिकांनी सहभाग घेतला. सातशे मीटर लांबीचा तिरंगा हे या हुंकार रॅलीचे मुख्य आकर्षण ठरले. स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सकाळी ९ वाजताच्या सुमारास हुंकार रॅलीला सुरुवात झाली. सराफा लाईन, मेनरोड, डॉ. कृष्णचंद्र बबेरवाल चौक, जुनी सराफा लाईन, पंचवाटकर गल्ली, अष्टभुजा देवी चौक, आप्पास्वामी मंदिर, आसनगल्ली, शिवाजी चौक मार्गे आंबेडकर चौक, सिव्हिल लाइन, पोस्ट आॅफिस चौक मार्गे तहसील कार्यालय येथे ही हुंकार रॅली धडकली. यावेळी तहसिलदार अजीत शेलार यांना निवेदन देण्यात आले. सीएए  या कायद्याविषयीचा गैरसमज दूर व्हावा व या कायद्याविषयी जनजागरण व्हावे या उद्देशाने ही रॅली काढण्यात आली. रिसोड शहराच्या इतिहासात ‘न भुतो’ अशी ही रॅली निघाली. सकाळी नऊ वाजता सुरु झालेल्या रॅलीचा समारोप तहसिल कार्यालयात पोहचल्यावर व्याख्यानानंतर ११.३० वाजता झाला. या काळात शहरातील संपूर्ण व्यापारपेठ बंद होती. दुपारी १२ वाजतानंतर स्वंयसेवकांच्या विनंतीवरून सर्व व्यापाºयांनी त्यांची प्रतिष्ठाण सुरु केली. या रॅलीमध्ये राष्ट्रीय सुरक्षा मंचचे स्वयंसेवक, व्यापारी महासंघ, माजी सैनिक, डॉक्टर असोसिएशन, महात्मा फुले भाजी मार्केट, विधिज्ञ मंडळ, साईबाबा आॅटोचालक संघटना, शहरातील सर्व व्यायाम शाळा, सर्व सार्वजनिक गणेश मंडळ व दुर्गा मंडळ, शहर व तालुक्यातील विविध संघटना, शेकडोंच्या संख्येने सहभागी झाल्या. या रॅलीत महिला, युवती, युवकांचा मोठया प्रमाणात सहभाग दिसुन आला.

टॅग्स :Risodरिसोडcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNational Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादी