शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा संस्कृती रूजविण्याचा प्रयत्न- राजदीप मनवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 17:33 IST

लॉन टेनिसमध्ये राष्ट्रीय मार्गदर्शक होण्याचा बहुमान वाशिम येथे क्रीडा शिक्षक राजदीप मनवर यांना मिळाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अभ्यासाबरोबरच आता क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थी चमकदार कामगिरी बजावत आहेत. खेळाडू घडविण्यासाठी उत्कृष्ट मार्गदर्शकही तेवढाच महत्वाचा ठरतो. लॉन टेनिसमध्ये राष्ट्रीय मार्गदर्शक होण्याचा बहुमान वाशिम येथे क्रीडा शिक्षक राजदीप मनवर यांना मिळाला आहे. अमरावती विभागातील ते पहिलेच राष्ट्रीय मार्गदर्शक ठरले आहेत. लॉन टेनिस, खेळाडूंचा कल, वाशिमसह विदर्भातील खेळाडूंचे स्थान यासह विविध क्रीडा विषयक बाबींशी मनवर यांच्याशी साधलेला हा संवाद......प्रश्न : लॉन टेनिसमध्ये राज्यात किती राष्ट्रीय मार्गदर्शक आहेत?उत्तर - आॅल इंडिया लॉन टेनिस असोसिएशनव्दारा लॉन टेनिसमध्ये राष्ट्रीय मार्गदर्शकासाठी राष्टÑीय स्तरावर ग्रेड तीनची परीक्षा घेतली जाते. यावर्षी या परीक्षेत महाराष्ट्रातील माझ्यासह केवळ दोन मार्गदर्शक उत्तीर्ण झाले. आतापर्यंत अमरावती विभागात लॉन टेनिसमध्ये राष्ट्रीय मार्गदर्शक होण्याचा मान कुणालाही मिळाला नाही. राज्यात ७ ते ८ मार्गदर्शक आहेत.प्रश्न : यापूर्वी मार्गदर्शक म्हणून जिल्हा, विभाग किंवा राज्यस्तरीय स्पर्धेत मान मिळाला होता का ?उत्तर - दोन वर्षांपूर्वी १९ वर्षाआतील शालेय लॉन टेनिस स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे  कोच (प्रशिक्षक) म्हणून सेवा दिली आहे. महाराष्ट्र संघाने यावेळी गोल्ड मेडल मिळविते होते.प्रश्न लॉन टेनिसबद्दल काय सांगाल ?उत्तर - अलिकडच्या काळात दहावीच्या गुणपत्रिकेत क्रीडा गुणांचा समावेश करण्यात आल्याने विद्यार्थी मोठ्या संख्येने क्रीडा क्षेत्राकडे वळत आहेत, ही आनंदाची बाब आहे. इतर खेळांच्या तुलनेत लॉन टेनिसकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी असला तरी अलिकडच्या काळात लॉन टेनिसकडे वाशिम जिल्ह्यातील खेळाडू आकर्षित होत असल्याचे आशादायी चित्र आहे. वाशिम जिल्ह्यातील अधिकाधिक खेळाडू हे लॉन टेनिसमध्ये चमकदार कामगिरी कशी करतील याला प्राधान्य देण्याचा प्रयत्न राहिल.प्रश्न लॉन टेनिस स्पर्धेत खेळाडूंचे स्थान काय ?उत्तर - अलिकडच्या काळात वाशिम जिल्ह्यातील खेळाडू लॉन टेनिस या क्रीडा प्रकारात चांगली कामगिरी करीत असल्याचे दिसून येते. विभाग व राज्यस्तरावर १५ पेक्षा अधिक खेळाडूंनी विविध वयोगट व प्रकारात पदके मिळविली आहेत. वाशिमचे खेळाडू राष्ट्रीय स्तर स्पर्धेत चमकावे याचा प्रयत्न राहणार आहे.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखतTennisटेनिस