शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम वऱ्हाडातील पावसाचे प्रमाण तुरीसाठी लाभदायक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 14:09 IST

वाशिम: आॅगस्ट महिन्याच्या मध्यंतरी पश्चिम वऱ्हाडातील  दमदार पाऊस झाल्याने खरीपातील बहुतांश पिकांना फटका बसला असला तरी, तुरीच्या पिकासाठी हा पाऊस लाभदायक ठरणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: आॅगस्ट महिन्याच्या मध्यंतरी पश्चिम वऱ्हाडातील  दमदार पाऊस झाल्याने खरीपातील बहुतांश पिकांना फटका बसला असला तरी, तुरीच्या पिकासाठी हा पाऊस लाभदायक ठरणार आहे. पश्चिम विदर्भातील तिन्ही जिल्ह्यात सोयाबीननंतर तुरीचा पेरा सर्वाधिक असून, पावसाचे प्रमाण पाहता या पिकाच्या उत्पादनात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तविली आहे. या तिन्ही जिल्ह्यात मिळून १ लाख ९५ हजार ८०९ हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली आहे.पश्चिम वºहाडातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस पडला आहे. त्यातच आॅगस्ट महिन्याच्या मध्यंतरी जोरदार पावसामुळे काही ठिकाणी सोयाबीन, मुग, उडिद या पिकांना फटका बसला; परंतु खरीपातील दिर्घकालीन पिके असलेल्या तुरीच्या पिकासाठी हा पाऊस लाभदायक ठरला आहे. आता मुग आणि उडिद ही पिके काढणीवर आली आहेत, तर सोयाबीनचे पीकही महिनाभरातच काढणीवर येणार आहे. या पिकांतच आंतर पिक म्हणून तुरीची पेरणी मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे ही पिके काढल्यानंतर जमिनीतील ओलावा तुरीच्या वाढीसाठी पोषक ठरून उत्पादनात वाढ होण्याची शक्यता त्यामुळे निर्माण झाली आहे. तथापि, पुढे सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस आल्यास या पिकाला मारकही ठरणार असल्याचे कृषी तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे. बुलडाणा जिल्ह्यात ८१४९४, वाशिम जिल्ह्यात ५९७८०, तर अकोला जिल्ह्यातील ५४५३५ हेक्टर मिळून तिन्ही जिल्ह्यात १ लाख ९५ हजार ८०८ हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी यंदा झाली असून. सद्यस्थितीत बुलडाणा जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ६४ टक्के, वाशिम जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ९२ टक्के पावसाची नोंद झाली आहे, तर अकोला जिल्ह्यातही समाधानकारक पाऊस पडल्याने तुरीच्या पिकाला मोठा फायदा होणार आहे.ज्या जमिनीची पाणीधारण क्षमता अधिक असते त्या जमिनीवरील तुरीच्या पिकाला जास्त पावसाचा धोका असतो. तुरीची पाने पिवळी पडून उत्पादनात घट येण्याची शक्यता असते; परंतु आपल्याकडील जमिनीचा प्रकार पाहता आॅगस्ट महिन्यात झालेल्या पावसाचा तुरीला फायदा होऊन उत्पादनात काही प्रमाणात वाढ होऊ शकणार आहे.-आर. एस. डवरेकृषी शास्त्रज्ञकृषी विज्ञान केंद्र करडा (वाशिम)

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती