शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची दडी; त्यातच वन्यप्राण्यांचा हैदोस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:25 IST

वाशिम : मागील १० दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यातच वन्यप्राण्यांनी पिकांमध्ये हैदोस घातल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे. ...

वाशिम : मागील १० दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यातच वन्यप्राण्यांनी पिकांमध्ये हैदोस घातल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे.

गतवर्षातील नैसर्गिक आपत्तीतून स्वत:ला सावरत यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने खरीप हंगामात पेरणी आटोपली. मृग नक्षत्रात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने आणि त्यानंतरही अधूनमधून पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पिके चांगलीच बहरली. परंतु, गत १० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यातच हरीण, वानर, रोही आदी वन्यप्राण्यांनी शेतात हैदोस घालून पिकांची नासाडी चालविल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. रिसोड तालुक्यातील चिखली, कवठा, किनखेडा, व्याड, वनोजा, घोटा, मालेगाव तालुक्यातील डही, वारंगी, कळंबेश्वर, मेडशी तसेच वाशिम तालुक्यातील पार्डीटकमोर, अडोळी, कार्ली शेतशिवारात वन्यप्राण्यांनी धुमाकूळ घातल्याने पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. वन्यप्राण्यांपासून पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. परंतु सकाळी किंवा सायंकाळनंतर शेतात थांबणे शक्य होत नसल्याने या वेळेत वन्यप्राण्यांकडून पिकांची नासाडी अधिक प्रमाणात होत असल्याचे दिसून येते.

०००

वन विभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा !

एकीकडे पावसाने दडी मारल्याने पिके सुकून जात आहेत, तर दुसरीकडे वन्यप्राण्यांनी हैदोस घातल्याने पिकांची नासाडी होत आहे. वन विभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी डही येथील प्रगतशील शेतकरी उमेश अवचार, दीपक अवचार, पवन अवचार आदींनी केली आहे.