शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची दडी; त्यातच वन्यप्राण्यांचा हैदोस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:50 IST

वाशिम : मागील १० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने आणि त्यातच वन्यप्राण्यांनी पिकांमध्ये हैदोस घातल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. ...

वाशिम : मागील १० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने आणि त्यातच वन्यप्राण्यांनी पिकांमध्ये हैदोस घातल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.

गतवर्षातील नैसर्गिक आपत्तीतून स्वत:ला सावरत यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने खरीप हंगामात पेरणी आटोपली. मृग नक्षत्रात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने आणि त्यानंतरही अधूनमधून पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पिके चांगलीच बहरली. परंतु, गत १० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यातच हरीण, वानर, रोही आदी वन्यप्राण्यांनी शेतात हैदोस घालून पिकांची नासाडी चालविल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. रिसोड तालुक्यातील चिखली, कवठा, किनखेडा, व्याड, वनोजा, घोटा, मालेगाव तालुक्यातील डही, वारंगी, कळंबेश्वर, मेडशी तसेच वाशिम तालुक्यातील पार्डीटकमोर, अडोळी, कार्ली शेतशिवारात वन्यप्राण्यांनी धुमाकूळ घातल्याने पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. वन्यप्राण्यांपासून पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. परंतु सकाळी किंवा सायंकाळनंतर शेतात थांबणे शक्य होत नसल्याने या वेळेत वन्यप्राण्यांकडून पिकांची नासाडी अधिक प्रमाणात होत असल्याचे दिसून येते.

०००

वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा !

एकीकडे पावसाने दडी मारल्याने पिके सुकून जात आहेत, तर दुसरीकडे वन्यप्राण्यांनी हैदोस घातल्याने पिकांची नासाडी होत आहे. वन विभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी डही येथील प्रगतशील शेतकरी उमेश अवचार, दीपक अवचार, पवन अवचार आदींनी केली.

०००००