लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव पेन : पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी हजेरी लावली. मात्र, आसेगाव परिसरात सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण कमी राहिले असून, परतीच्या पावसानेही हुलकावणी दिल्यामुळे बोराळा येथील धरण अद्याप कोरडेच आहे. या बिकट स्थितीमुळे भविष्यात भीषण पाणीटंचाई जाणवणार असल्याचे संकेत आहेत. परिसरातील आसेगाव बांध २0 टक्के, पिंपळगाव २0 टक्के, नांदगाव येथील धरणात १0 टक्के, सार्सी येथील धरणात २0 टक्के, चिंचखेड येथील धरणात २0 टक्के असा साठा उपलब्ध आहे. गतवर्षी याच तारखेपर्यंत ही धरणे ८0 ते १00 टक्केपर्यंत भरली होती. मात्र यंदा परिस्थिती फारच बिकट झाली आहे. आसेगाव परिसरात मागील वर्षीच्या तुलनेत नांदगाव, शिवणी, चिंचोली पिंपळगाव, कुंभी, चिंचखेड या भागातील पिके संकटात असण्यासोबतच पिण्याचा पाण्याचाही प्रश्न गंभीर होणार आहे.
आसेगाव परिसरात पावसाची हुलकावणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 01:18 IST
आसेगाव पेन : पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी हजेरी लावली. मात्र, आसेगाव परिसरात सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण कमी राहिले असून, परतीच्या पावसानेही हुलकावणी दिल्यामुळे बोराळा येथील धरण अद्याप कोरडेच आहे. या बिकट स्थितीमुळे भविष्यात भीषण पाणीटंचाई जाणवणार असल्याचे संकेत आहेत.
आसेगाव परिसरात पावसाची हुलकावणी!
ठळक मुद्देभीषण पाणीटंचाईचे संकेत बोराळा येथील धरण अद्याप कोरडेच!