शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
2
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
3
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
4
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
5
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
6
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
7
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
8
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
9
"लोकांना हाच समज आहे की माझं लग्नच झालं होतं..", भाग्यश्री मोटे मोडलेल्या नात्यावर स्पष्टच बोलली
10
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
11
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
12
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
13
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
14
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
16
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
17
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
18
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
19
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
20
Rahul Gandhi : "नरेंद्र मोदी मोठी समस्या नाही, मी दोनवेळा भेटलो, माध्यमांनी खूप महत्व..." राहुल गांधींचा हल्लाबोल

वाशिममध्ये आणखी तीन दिवस पावसाचा अंदाज: लेंढी नदीला पूर, वाशिम तालुक्यातही पाऊस मनसोक्त बरसला

By संतोष वानखडे | Updated: July 14, 2024 18:13 IST

सर्वदूर पाऊस; नदी-नाले झाले वाहते...

संतोष वानखडे / वाशिम : जिल्ह्यात रविवारी (दि.१४) सकाळपासूनच सार्वत्रिक स्वरुपात दमदार पावसाने हजेरी लावल्याने नदी-नाले वाहते झाले. वाशिम तालुक्यातही दमदार पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला असून, पिकांना संजीवणी मिळाली.

यंदा जिल्ह्यात मान्सूनचे वेळेवर आगमन झाल्याने बहुतांश पेरण्यादेखील वेळेवर सुरू झाल्या. जिल्ह्यातील वाशिम, मानोरा, कारंजा तालुक्याच्या तुलनेत रिसोड व मालेगाव तालुक्यात सुरूवातीपासून सार्वत्रिक स्वरुपात दमदार पाऊस झाला. वाशिम व मानोरा तालुक्याला दमदार पावसाची प्रतिक्षा कायम होती. दरम्यान, शनिवारी सायंकाळपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी तूरळक प्रमाणात पाऊसही झाला होता. रविवारी (दि.१४) सकाळी ८:३० वाजतापासूनच जिल्ह्यात पावसाला सर्वदूर सुरूवात झाली. वाशिम शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातही दमदार पाऊस झाला. दिवसभर थोडी-थोडी विश्रांती घेत पाऊस बरसल्याने शेतकरी सुखावला. दमदार पाऊस झाल्याने जलस्त्रोतात वाढ होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. मंगरूळपीर, मालेगाव, रिसोड, कारंजा व मानोरा तालुक्यातही सार्वत्रिक स्वरुपात दमदार पाऊस झाला. हवामान खात्याने पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तविला आहे. 

१४ दिवसांत सरासरी १२७ मि.मी. पाऊस

जिल्ह्यात जुलै महिन्याच्या १४ दिवसांत सरासरी १२७ मि.मी. पाऊस झाला. यामध्ये सर्वाधिक १५४.९० मि.मी. पाऊस  मालेगाव तालुक्यात तर सर्वात कमी ९०.९० मि.मी. पाऊस कारंजा तालुक्यात झाला. जुलै महिन्यात सरासरी २४३.६० मि.मी. पाऊस अपेक्षित होता. त्यापैकी १४ जुलैपर्यंत सरासरी १२७ मि.मी. पाऊस झाल्याने एका महिन्याच्या सरासरीत या १४ दिवसांत ५२.१० टक्के पाऊस झाला. १४ दिवसांत कोणत्या तालुक्यात किती पाऊस?

तालुका / पाऊस

वाशिम / १३६.२०रिसोड / १११.१०मालेगाव / १५४.९०मं.पीर / १३१.००मानोरा / १४१.००कारंजा / ९०.९०

लेंढी नदीला पूर

सततच्या पावसामुळे एरंडा (ता.मालेगाव) येथील लेंढी नदीला पुर आला. रविवारी दुपारी १ वाजता एरंडा जवळील पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे या पुलाच्या दोन्ही बाजूने वाहनांची रांग लागली होती. शेतात गेलेल्या महिला या पुलाच्या एका बाजुला अडकल्या होत्या. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर सायंकाळी वाहतूक पूर्ववत झाली. या पुरामुळे सायंकाळपर्यंत वाशिम ते किन्हीराजा या मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती.

टॅग्स :washimवाशिम