शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

शेतक-यांसाठी रेल्वेगेटचा मार्ग झाला खुला!

By admin | Updated: October 15, 2016 02:39 IST

अकोला-पूर्णा या रेल्वे मार्गावरील ११६ क्रमांकाचे रेल्वे गेट तात्पुरते खुले; लवकरच उर्वरित कामही पूर्णत्वास.

वाशिम, दि. १४- शहरातून गेलेल्या अकोला-पूर्णा या रेल्वे मार्गावर असलेल्या तामसाळा, अंजनखेडा, घोडबाभुळ शेतशिवारातील शेतकर्‍यांना अडचणीचे ठरलेले ११६ क्रमांकाचे रेल्वे गेट शुक्रवारी खासदार भावना गवळी यांच्या प्रयत्नाने रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांना ये-जाकरण्याकरिता तात्पुरत्या स्वरुपात उपलब्ध करून दिले. लवकरच याला पर्याय म्हणून उर्वरित कामही पूर्णत्वास जाणार आहे. वाशिम शहरातील पाळेश्‍वर ते अंजनखेडा या रस्त्यावर रेल्वेचे गेट क्रमांक ११६ असून, या परिसरात तामसाळा, अंजनखेडा, घोडबाभूळ शेतशिवारातील असंख्य शेतकर्‍यांची शेती आहे. या शेतकर्‍यांना शेती उत्पादनाच्या दळणवळणाकरिता हा एकमेव रस्ता होता; परंतु या रस्त्यावर रेल्वे प्रशासनाने गेल्या दोन महिन्यांपूर्वी वाढणार्‍या रेल्वे गाड्यांच्या वेळांमुळे रेल्वे प्रशासनाच्या आदेशाने वरील रस्ता कायमस्वरुपी बंद केला. यावर्षी शेतात झालेले उत्पादन घरापर्यंंंंंत आणता येत नसल्याने याचा मनस्ताप शेतकर्‍यांना सहन करावा लागत होता. यासंदर्भात शेतकर्‍यांनी खासदार गवळी यांच्याकडे तक्रार नोंदविली. याची दखल घेत भावना गवळी यांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करुन ४ ऑक्टोबर रोजी रेल्वेचे नांदेड येथील वरिष्ठ अधिकारी अकोला व वाशिम येथील अधिकारी यांच्या उपस्थितीत तात्पुरत्या स्वरुपात सदर रस्ता खुला करुन घेतला. लवकरच याला पर्याय म्हणून उर्वरित कामही पूर्णत्वाकडे जाणार असल्याचे खासदार गवळी यांनी सांगितले. सदर रस्ता खुला करण्याकरिता भावना गवळी, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, ग्रामस्थ आणि शेतकर्‍यांची यावेळी उपस्थिती होती. रेल्वे प्रशासनातील अधिकारी एन.जी.श्रीनिवासन, एन.चंद्रमोहन, सर्वेश कुमार यांच्याशी चर्चा करताना गवळी यांनी गेट क्रमांक ११६ बरोबरच केकतउमरा येथील अंडरब्रिजमधील साचत असलेल्या पाण्याच्या त्रासामुळे तेथील ग्रामस्थांची दररोज होणारी तारांबळ लक्षात घेऊन सदर पाण्याची व्यवस्था करावी, त्या ब्रिजचा विस्तार करणे, पुसद रोड आणि हिंगोली रोड येथील पुलाची कार्यप्रक्रिया पूर्ण करणे, वाशिम स्टेशनवरुन विविध प्रकारच्या रेल्वे गाड्या वाढविणे, प्लॉट फार्मवरील शेडचा विस्तार करणे, आदी कामांचे निर्देश गवळी यांनी दिले.