शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

घरकुल, शौचालय, विहीर अनुदानास विलंब करणारे प्रशासनाच्या रडारवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 15:31 IST

वाशिम : घरकुल, शौचालय व सिंचन विहिरीच्या अनुदान वितरणास विलंब होत असल्याची बाब जिल्हा परिषद प्रशासनाने गांभीर्याने घेतली असून, संबंधित लाभार्थींना तातडीने अनुदान वितरण करा अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा देण्यात आला.

ठळक मुद्देवारंवार सूचना देऊन पात्र लाभार्थींना अनुदान वितरणास प्रचंड विलंब केला तर कारवाईचा इशाराही देण्यात आला.विलंब होत असेल तर संबंधित लाभार्थींना थेट आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : घरकुल, शौचालय व सिंचन विहिरीच्या अनुदान वितरणास विलंब होत असल्याची बाब जिल्हा परिषद प्रशासनाने गांभीर्याने घेतली असून, संबंधित लाभार्थींना तातडीने अनुदान वितरण करा अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा देण्यात आला.विविध योजनेंतर्गत शेतकºयांना विहीर बांधकामासाठी शासनाच्यावतीने अनुदान दिले जाते. विहीर बांधकामाच्या टप्प्यानुसार संबंधित लाभार्थींना अनुदान मिळणे अपेक्षीत आहे. विहीर बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही लाभार्थींना अनुदान मिळण्यास प्रचंड विलंब होत असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनात आली आहे. यासंदर्भात काही लाभार्थींनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रारीदेखील केल्या आहेत. सिंचन विहीर योजनेप्रमाणेच घरकुल व शौचालय बांधकामाचे अनुदान मिळण्यासही विलंब होत आहे. प्रधानमंत्री घरकुल योजना तसेच रमाई आवास योजनेंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थींना तीन टप्प्यात अनुदान दिले जाते. बांधकामाच्या त्या-त्या टप्प्यानुसार अनुदान मिळावे, यासाठी लाभार्थींना पंचायत समिती कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात.  अशीच परिस्थिती स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गतच्या शौचालय अनुदानाचीदेखील आहे. शौचालय बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही काही लाभार्थींना अनुदान मिळाले नाही. प्रलंबित अनुदानाचा तिढा सोडविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ आखला असून, संबंधित लाभार्थींना १५ दिवसाच्या आत अनुदान वितरित करण्याच्या सूचना पंचायत समिती प्रशासनाला दिल्या. वारंवार सूचना देऊन पात्र लाभार्थींना अनुदान वितरणास प्रचंड विलंब केला तर कारवाईचा इशाराही देण्यात आला. अनुदान वितरणास पंचायत समिती स्तरावर विलंब होत असेल तर संबंधित लाभार्थींना थेट आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद