शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

सात कोल्हापूरी बंधाऱ्यांचा प्रश्न निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 18:10 IST

वशिम : जिल्ह्यातील सात कोल्हापूरी बंधाºयांचा प्रश्न निकाली निघाला असून, सध्या निविदा प्रक्रिया सुरू आहे. या प्रकल्पांमुळे ३५० हेक्टर जमिन सिंचनाखाली येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवशिम : जिल्ह्यातील सात कोल्हापूरी बंधाºयांचा प्रश्न निकाली निघाला असून, सध्या निविदा प्रक्रिया सुरू आहे. या प्रकल्पांमुळे ३५० हेक्टर जमिन सिंचनाखाली येणार आहे. याशिवाय एका लघु सिंचन प्रकल्पाचा प्रश्नही मार्गी लागला असून, यासाठी १.७२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.ग्रामीण भागातील शेतजमिन अधिकाधिक प्रमाणात सिंचनाखाली आणण्यासाठी जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागातर्फेदेखील कोल्हापूरी बंधारे, लघु सिंचन प्रकल्पांच्या कामांना प्राधान्य दिले जाते. चालू वर्षात जिल्ह्यातील एकूण सात कोल्हापूरी बंधाºयांची कामे प्रस्तावित करण्यात आली होती. यामध्ये वाशिम तालुक्यातील तोंडगाव भाग एक व दोन, रिसोड तालुक्यातील हराळ व बोरखेडी, मंगरूळपीर तालुक्यातील आसेगाव व लाठी आणि मानोरा तालुक्यातील गुंडी अशा सात कोल्हापूरी बंधाºयांच्या कामांना तांत्रिक व प्रशासकीय मंजूरात मिळाली असून, सदर कामांची सध्या निविदा प्रक्रियादेखील सुरू झाली आहे. तोंडगाव भाग एक येथील कोल्हापूरी बंधाºयासाठी ८५ लाख रुपये, भाग दोन साठी ९० लाख रुपये, हराळ येथे ५७ लाख, बोरखेडी येथे ५९ लाख रुपये, आसेगाव येथे ५४ लाख रुपये, लाठी येथे ९५ लाख रुपये तर गुंडी येथील कोल्हापूरी बंधाºयासाठी ७९ लाख रुपये निधीही मंजूर झाला आहे. यामुळे ३५० हेक्टर जमिन सिंचनखाली येणार असून, यामुळे त्या, त्या परिसरातील शेतकºयांना नवसंजिवणी मिळणार असल्याचा विश्वास जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी व्यक्त केला. दरम्यान, गुंडी येथील कोल्हापूरी बंधाºयासाठी जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीच्या सभेत जिल्हा परिषद सदस्य हेमेंद्र ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित करून याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले जाते.  इलखी लघु सिंचन प्रकल्पासाठी १.७२ कोटींचा निधीइलखी येथील लघु सिंचन प्रकल्पासाठी १.७२ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित असून, तांत्रिक मान्यतेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या लघु सिंचन प्रकल्पातून ७० ते ८० हेक्टर जमिन सिंचनाखाली येणार आहे. आवश्यक ते प्रशासकीय सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर या प्रकल्पाच्या कामाला सुरूवात होईल, असे जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी सांगितले.