मंगरूळपीर : आदीवासीबहुल जनुना येथे पक्का रस्ता नसल्यामुळे ग्रामस्थांनी आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा ईशारा निवेदनाव्दारे दिला होता. जिल्हाधिकार्यांनी या निवेदनाची दखल घेवून संबधीतांना पुढील कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे पत्र पंचायत समितीचे माजी सदस्य गजानन मांगाडे यांना प्राप्त झाले आहे.वाशिम-मंगरूळपीर विधानसभा मतदारसंघाच्या सिमेवर येत असलेल्या जनुना येथील ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी पक्का रस्ताच नाही. त्यामुळे त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. जनुना वासियांच्या या समस्येचा ह्यलोकमतह्णने वारंवार पाठपुरावा केला. त्यानंतर दोन वर्षापुर्वी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेर्तगत मंजूर झालेल्या रस्त्याचे काम सुरू झाले. परंतु सदर रस्ता आजघडीला अर्धवट अवस्थेत पडलेला आहे. हा रस्ता पुर्ण करून द्यावा, अशी मागणी अनेक वेळा ग्रामस्थांकडून करण्यात आली; परंतु त्यांच्या मागणीकडे संबधित अधिकार्यांनी मुळीच लक्ष दिले नाही. प्रशासनाच्या बेजबाबदार वृत्तीला कंटाळलेल्या जनुनावासियांनी अखेर जनुना ग्रामवासीयांनी ह्यरस्ता नाही तर मतदान नाहीह्ण अशी भूमिका घेत आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा ईशारा जिल्हाधिकार्यांना १९ ऑगस्ट रोजी निवेदनाव्दारे दिला होता. या निवेदनाची जिल्हाधिकार्यांनी दखल घेवून संबधितांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.सदर रस्त्या प्रकरणी मंगरूळपीर तहसीलदारांनी जनुना खु. तलाठीकडून अहवाल मागितला. त्यानुसार जनुना ते चोरद संपुर्ण रस्ता अडचणीचा असून त्या रस्त्याने येजा करणे कठीण झाले आहे. काही दिवसापुर्वी रस्त्याचे काम चालू झाले होते परंतु सध्या बंद आहे. त्या गावातील शेतकर्यांना सदर रस्त्यांनी बैलगाडी सुध्दा ने आण करता येत नाही. रस्त्याची पाहणी केली असता २ किमी पांदन रस्ता आहे हा रस्ता दुरूस्त करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकार्यांना पत्राव्दारे तहसिलदारांनी कळविल्याचे पत्र प्राप्त झाले. चोरद जनुना पांदन रस्त्याचे काम रोजगार हमी योजनेतंगत काही प्रमाणात झाले. पुढील कामासंदर्भात अंदाजपत्रक तयार असून सार्वजनिक पाहणी केल्यावर उर्वरित रस्त्याचे काम करून देण्यात येणार असल्याचे सा.बां. विभागाचे उपविभागीय अधिकारी बी.बी.सोनवणे यांनी सांगीतले.
जनुना येथील रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार
By admin | Updated: September 4, 2014 22:56 IST