शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

क्वारंटिन, आयसोलेशन वार्डची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 15:32 IST

जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक व पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी पाहणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा आवश्यक उपाययोजना करीत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला संशयित रुग्ण आढळल्यास त्याच्यावर उपचार करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आयसोलेशन वार्ड तयार करण्यात आला आहे. तसेच परदेशातून परत आलेल्या नागरिकांना निगराणीखाली ठेवण्यासाठी जिल्हा महिला रुग्णालय परिसरातील शासकीय परिचारिका प्रशिक्षण केंद्रात क्वारंटाईन वार्ड तयार करण्यात आला आहे. या दोन्ही वार्डची २४ मार्च रोजी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक व पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी पाहणी केली.यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, डॉ. पवार, डॉ. मडावी उपस्थित होते. जिल्हाधिकारी मोडक यांनी सर्वप्रथम क्वारंटाईन वार्डची पाहणी केली. या वार्डमध्ये ५० व्यक्तींना निगराणीखाली ठेवण्याची क्षमता आहे. सध्या बाधित देशातून परत आलेल्या ५ व्यक्तींना वार्डमध्ये ठेवण्यात आले आहे. यापैकी कोणालाही अद्याप कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नसून सर्वांची प्रकृती चांगली असल्याची माहिती क्वारंटाईन वार्डचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. पवार यांनी दिली.वार्डमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांचा आढावा यावेळी जिल्हाधिकाºयांनी घेतला. तसेच आवश्यकता भासल्यास वार्डची क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने पूर्वनियोजन करावे. वार्डमध्ये नियुक्त सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनी सुद्धा आपल्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घ्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या.जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ६ बेडचा स्वतंत्र आयसोलेशन कक्ष सज्ज ठेवण्यात आला असून आवश्यक औषधी, सामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कक्षासाठी स्वतंत्र वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. आवश्यकता भासल्यास खाजगी हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन वार्ड तयार करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सोनटक्के यांनी यावेळी दिली. ‘कोरोना’चा संसर्ग झालेला एकही संशयित अथवा पॉझिटिव्ह रुग्ण नाही. मात्र तरीही आरोग्य विभागाने आवश्यक सज्जता ठेवावी. याकरिता आवश्यक सामग्री, औषधी खरेदी करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे जिल्हाधिकारी मोडक यावेळी म्हणाले.

टॅग्स :washimवाशिमCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस