शहरं
Join us  
Trending Stories
1
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
4
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
5
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
6
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
7
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
8
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
9
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
10
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
11
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
12
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
13
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
14
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?
15
ITR चुकला? घाबरू नका, 'या' तारखेपर्यंत भरा बिलिटेड रिटर्न; पण, इतका दंड आणि व्याज भरावे लागणार
16
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
17
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
18
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
19
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
20
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?

उपबाजार बंद पाडून निच्चांकी दराने शेतमालाची खरेदी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 19:37 IST

वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक राजू चौधरी यांच्यासह अनसिंग उपबाजार समितीचे उपसभापती रामेश्वर काटेकर, संचालक डॉ. जगदीश दहात्रे आदिंनी संतप्त शेतक-यांना सोबत घेवून बाहेर बेकायदेशीर सुरू असलेली शेतमाल खरेदी बंद पाडली.

ठळक मुद्दे व्यापा-यांच्या मनमानीचा अनसिंगमध्ये अतिरेकराजू चौधरी यांनी सुनावले खडे बोल

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: तालुक्यातील अनसिंग या तुलनेने मोठ्या गावातील उपबाजार समितीअंतर्गतच्या व्यापा-यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून मनमानी कारभार चालविला असून त्याचा सोमवारी खºयाअर्थाने अतिरेक झाला. नाणेटंचाईचे कारण समोर करून आधी बाजार समिती बंद पाडणा-या या व्यापा-यांनी बाहेर बसून मात्र निच्चांकी दराने शेतमालाची खरेदी केली. दरम्यान, हा प्रकार असह्य झाल्याने वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक राजू चौधरी यांच्यासह अनसिंग उपबाजार समितीचे उपसभापती रामेश्वर काटेकर, संचालक डॉ. जगदीश दहात्रे आदिंनी संतप्त शेतक-यांना सोबत घेवून बाहेर बेकायदेशीर सुरू असलेली शेतमाल खरेदी बंद पाडली.अनसिंग येथील श्री हुरकट अ‍ॅण्ड कंपनी, श्री म.मा. मोदानी, श्री ट्रेडिंग कंपनी, श्री गोविंद ट्रेडिंग कंपनी, श्री मानधने अ‍ॅण्ड कंपनी, श्री तिरूपती ट्रेडिंग कंपनी चालविणाºया व्यापा-यांनी १४ आॅक्टोबरला अनसिंग उपबाजार समितीकडे रितसर पत्रव्यवहार करून नाणेटंचाई आणि सोया प्लांटच्या खरेद्या बंद असल्याचे कारण समोर करून १६ आॅक्टोबरपासून २१ आॅक्टोबरपर्यंत उपबाजार बंद ठेवण्याबाबत कळविले. त्यानुसार, १६ आॅक्टोबरला अनसिंगचा उपबाजार बंद राहिला. असे असताना काही व्यापा-यांनी बाहेर नियमबाह्य पद्धतीने शेतमाल खरेदी केला. विशेष म्हणजे बाजार समितीत मिळणाºया दरापेक्षा अगदीच अल्प दर शेतक-यांना देण्यात आले. दरम्यान, हा गंभीर प्रकार लक्षात येताच राजू चौधरी, उपसभापती रामेश्वर काटेकर, डॉ. दहात्रे आदिंनी हस्तक्षेप करून ज्याठिकाणी शेतमालाची खरेदी सुरू होती, त्याठिकाणी धडक देवून व्यापा-यांना खडे बोल सुनावून शेतक-यांना अपेक्षित दर देण्याच्या सूचना केल्या. 

पाच हजार क्विंटल सोयाबिनची नियमबाह्य खरेदी!तकलादू कारणे समोर करून उपबाजार बंद पाडणाºया ज्या व्यापा-यांनी बाहेर सोयाबिनची नियमबाह्य खरेदी केली, त्यांच्या दुकानांचे पंचनामे करण्यात आले. त्यात सुमारे ५ हजार क्विंटल सोयाबिनची खरेदी झाल्याचे निष्पन्न झाले. विशेष गंभीर बाब म्हणजे यातील काही व्यापा-यांकडे तर शेतमाल खरेदीचा परवाना देखील नसल्याचे दिसून आले. दरम्यान, संबंधित व्यापा-यांवर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.  

टॅग्स :agricultureशेती