शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

वाशिम जिल्ह्यात नाफेडच्या मुग खरेदीचा मुहूर्तच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 16:38 IST

वाशिम: नाफेडच्यावतीने सप्टेंबरच्या अखेरीस जिल्ह्यात मुग आणि उडिदाच्या खरेदीसाठी नोंदणी सुरू केली आणि ले; परंतु आता दीड महिना उलटला तरी, मुगाची खरेदी एक किलोही कोणत्याच केंद्रावर झालेली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: नाफेडच्यावतीने सप्टेंबरच्या अखेरीस जिल्ह्यात मुग आणि उडिदाच्या खरेदीसाठी नोंदणी सुरू केली आणि ले; परंतु आता दीड महिना उलटला तरी, मुगाची खरेदी एक किलोही कोणत्याच केंद्रावर झालेली नाही. नाफेडकडे मुगाची विक्री करण्यासाठी नोंदणी करणाºया पाच तालुक्यातील ५३६ शेतकºयांना या खरेदीचा मुर्हूत निघण्याची प्रतिक्षा आहे.बाजारात यंदाच्या शेतमालास नगण्य भाव मिळत असल्याने शेतकरी वर्गाकडून शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. या पृष्ठभूमीवर शासनाच्यावतीने ३० सप्टेंबरपासून हमीभावाने खरेदीसाठी शेतकºयांची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्याच्या सुचना देण्यात आल्या. या अंतर्गत वाशिम जिल्ह्यात उडिद आणि मुगाच्या खरेदीसाठी शेतकºयांची नोंदणी सुरू करण्यात आली. तथापि, नोंदणी प्रक्रिया पूर्ण होऊनही खरेदी केंद्र सुरू होण्याची चिन्हे दिसत नसल्याने नोंदणी करणाºया शेतकºयांत रोषाचे वातावरण होते. या संदर्भात जिल्हा उपनिबंधकांकडे निवेदन सादर करून नाफेडचे खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणीही करण्यात येत होती. या मागणीनंतर जिल्ह्यात १५ आॅक्टोबरपासून मंगरुळपीर आणि कारंजा येथे मुग, उडिदाची खरेदी नाफेडमार्फत सुरू करण्यात आली. त्यानंतरही वाशिम, मालेगाव, मानोरा आणि रिसोड येथेही खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. नाफेडकडे मुगाची विक्री करण्यासाठी रिसोड येथील १, मानोरा येथील २१, मालेगाव येथील १५२, मंगरुळपीर येथील १२२ आणि कारंजा येथील २४० शेतकºयांनी नोंदणी केली; परंतु यातील एकाही शेतकºयाकडून मुगाची खरेदी अद्यापही होऊ शकलेली नाही. मुगाची खरेदी न होण्यामागचे कारणही नाफेडकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. उडिदाची खरेदीही नगण्यजिल्ह्यात नाफेडकडे उडिदाची विक्र ी करण्यासाठी जिल्ह्यातील ६७८४ शेतकºयांनी नोंदणी केली होती. यामध्ये रिसोड १३, मानोरा ५९४, मालेगाव १२४९, मंगरुळपीर ३४५८ आणि कारंजा येथील १४७० शेतकºयांचा समावेश होता. त्यापैकी १११ शेतकºयांकडून केवळ ६४८.७० क्विंटल उडिदाची खरेदी करण्यात आली. यामध्ये मंगरुळपीर येथील ३४ आणि कारंजा येथील ७७ शेतकºयांचा समावेश आहे, अर्थात इतर तीन ठिकाणी उडिदाची खरेदीच होऊ शकली नसल्याचेही स्पष्ट होत आहे.

टॅग्स :washimवाशिमAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती