शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात ११ मार्चला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 15:20 IST

वाशिम :  शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओची लस देण्यासाठी रविवार, ११ मार्च २०१८ रोजी सकाळी  ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे.

ठळक मुद्दे११ मार्च रोजी सकाळी ८ वाजतापासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बुथच्या ठिकाणी बालकांना पोलिओची लस दिली जाईल.ग्रामीण भागात ८१९, तर नागरी भागात १२५ अशा एकुण ९४४ पल्स पोलिओ लसीकरण बुथची स्थापना करण्यात आली आहे. बुथवर काम करण्यासाठी ग्रामीण भागात २१५१ नागरी भागासाठी ३६५ असे एकुण २५१६ मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली आहे.

वाशिम :  शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओची लस देण्यासाठी रविवार, ११ मार्च २०१८ रोजी सकाळी  ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. नागरिकांनी आपल्या पाच वर्षांखालील बालकांना पोलिओ लसीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. यापूर्वी पोलिओची लस दिली असली तरीही पुन्हा पोलिओची लस घेणे आवश्यक असल्याचे कळविण्यात आले आहे.पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेकरिता ग्रामीण भागात ८१९, तर नागरी भागात १२५ अशा एकुण ९४४ पल्स पोलिओ लसीकरण बुथची स्थापना करण्यात आली आहे. बुथवर काम करण्यासाठी ग्रामीण भागात २१५१ नागरी भागासाठी ३६५ असे एकुण २५१६ मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली आहे. मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी ग्रामीण भागात १६४ व नागरी भागासाठी २५ असे एकुण १८९ पर्यवेक्षकाची नियुक्ती करण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य विभागाने कळविले आहे.११ मार्च रोजी सकाळी ८ वाजतापासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बुथच्या ठिकाणी बालकांना पोलिओची लस दिली जाईल तसेच विट भट्ट्या, गिट्टी खदान, मजुरांच्या वस्त्यामधील बालकांना लसीकरण करण्यासाठी ग्रामीण भागात २४, तर नागरी भागात ७ अशा एकुण ३१ मोबाईल टीम कार्यरत राहणार आहेत. याशिवाय प्रवासातील बालकांना लसीकरण करण्यासाठी रेल्वे स्टेशन, बस स्टँड, बस थांबे, चौफुलीच्या ठिकाणी एकूण १०५ ट्रान्सिट टीम २ पाळीमध्ये उपलब्ध राहणार आहेत. १३ ते १५ मार्च या कालावधीत ग्रामीण भागात तसेच १३ ते १७ मार्च या कालावधीत शहरी भागात घरोघरी सर्वेक्षण करून बुथवर न आलेल्या बालकांना लसीकरण केले जाणार आहे.

टॅग्स :washimवाशिम