शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात दृष्टीदिन सप्ताहानिमित्त जनजागृती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 16:19 IST

वाशिम: राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांअंतर्गत डॉक्टर भालचंद्र स्मृती दृष्टिदिन सप्ताह म्हणून साजरा केला जात आहे. या अंतर्गत जनतेत जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, शासकीय रुग्णालयांत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. 

ठळक मुद्दे११ जून रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामिण रुग्णालयामध्ये व जिल्हा रुग्णालय, येथे नेत्ररुग्णांची तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.१२ जून रोजी नेत्रशस्त्रक्रीयेसाठी भरती करुन व इतर रुग्णांना नेत्रशल्य चिकित्सकाकडून योग्य तो उपचार व मार्गदर्शन करण्यात आले. १३ जून रोजी २१ मोतिबींदू रुग्णांवर मोफत अंतरभिंगावरापन नेत्रशस्त्रक्रीया करण्यात आल्या.

वाशिम: राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांअंतर्गत डॉक्टर भालचंद्र स्मृती दृष्टिदिन सप्ताह म्हणून साजरा केला जात आहे. या अंतर्गत जनतेत जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, शासकीय रुग्णालयांत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांअंतर्गत १० जून हा दिवस डॉ. भालचंद्र स्मृती दृष्टीदिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून दृष्टीदिन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने ११ जून रोजी वाशिम जिल्ह्यातील सर्व ग्रामिण रुग्णालयामध्ये व जिल्हा रुग्णालय, येथे नेत्ररुग्णांची तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर तपासणीत मोतिबींदू आढळलेल्या रुग्णांची तपासणी करुन त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात १२ जून रोजी नेत्रशस्त्रक्रीयेसाठी भरती करुन व इतर रुग्णांना नेत्रशल्य चिकित्सकाकडून योग्य तो उपचार व मार्गदर्शन करण्यात आले. १३ जून रोजी २१ मोतिबींदू रुग्णांवर मोफत अंतरभिंगावरापन नेत्रशस्त्रक्रीया करण्यात आल्या. १४ जून रोजी जिल्हा रुग्णालयात दृष्टीदिनानिमित्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांच्या अध्याक्षतेखाली रुग्ण,नातेवाईक व रुग्णालयीन अधिकारी व कर्मचाºयांची सभा आयोजीत करण्यात आली. यावेळी मार्गदर्शक म्हणून नेत्र शल्य चिकित्सक डॉ. अविनाश झरे, नेत्र शल्य चिकित्सक डॉ. आशिष बेदरकर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. एस.एस चांडोळकर यांनी नेत्रदानाबद्दल तसेच डोळयाच्या इतर आजाराबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. नेत्र शस्त्र क्रीया झालेल्या रुग्णांना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांचे हस्ते फळ वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमास जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन नेत्रचिकित्सा अधिकारी डॉ. जे.एस. बाहेकर यांनी तर आभार नेत्रदान समुपदेशक रमेश ठाकरे यांनी मानले. कार्यक्रम पार पाडण्यासाठी नेत्रचिकित्सा अधिकारी ज्ञानेश्वर पोटफोडे, सुधीर साळवे, ओम राऊत अधिपरिचारिका ढगे, भगत, साबळे आदी कर्मचाºयांनी अथक परिश्रम घेतले.

टॅग्स :washimवाशिमhospitalहॉस्पिटल