शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

पालकसभेतून गोवर, रुबेला लसीकरण मोहिमेबाबत जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 17:46 IST

पालक सभेच्या माध्यमातून शाळांमध्ये गोवर, रुबेला लसीकरण मोहिमेबाबत जनजागृती केली जात आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम) - तालुक्यात काही ठिकाणी गोवर, रुबेला लसीकरण मोहिमेसंदर्भात सोशल मीडियावर गैरसमज पसरविले जात असल्याने पालकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. या पृष्ठभूमीवर पालक सभेच्या माध्यमातून शाळांमध्ये गोवर, रुबेला लसीकरण मोहिमेबाबत जनजागृती केली जात आहे. गोवर-रुबेला लसीकरण मोहीम ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी राबविली जात आहे. यापूर्वी देशातील जवळपास २२ राज्यांमध्ये ही यशस्वीपणे राबविण्यात आली आहे. यावर्षी महाराष्ट्रात ही मोहिम राबविली जात असून, काही किरकोळ ठिकाणी घडलेल्या प्रकारांबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून गैरसमज, अफवा पसरविल्या जात असल्याने पालकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. हा संभ्रम, गैरसमज दूर करण्यासाठी तालुक्यात पालकसभा घेतल्या जात आहेत. या पालकसभेतून गोवर, रुबेला लसीकरण पूर्णत: सुरक्षित असून, पालकांनी कोणत्याही अफवा, गैरसमज यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १.४४ लाखापेक्षा अधिक बालकांना लसीकरण करण्यात आले आहे. मालेगाव तालुक्यात दिवसेंदिवस या मोहिमेला व्यापक प्रतिसाद मिळत असून ग्रामीण भागातील काही पालकवर्ग सद्यस्थितीत सोशल मीडियावर पसरविण्यात आलेल्या अफवांवर विश्वास ठेवत असल्याने या अफवा दूर करण्यासाठी तालुक्यातील अनेक शाळांमध्ये जनजागृतीसंबंधी पालक सभा,  शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सदर पालक सभा आणि शिबिरांमध्ये आरोग्य विभागातील चमू व बालरोग तज्ज्ञांनी मार्गदर्शन करून या केवळ अफवा असल्याचे सांगून लसीकरणाबाबतचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. गोवर व रूबेला लस ही  पूर्णपणे सुरक्षित असून लस देताना काहींना खाज व थोडा ताप येतो. परंतु यामुळे कोणत्याही स्वरूपाचा धोका नाही, असे बालरोग तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

 लसीकरणानंतर काही बालकांना ताप आल्याच्या तक्रारी नाकारता येत नाही. परंतु यामुळे कुठलाही धोका वा अपाय नाही. सदर लस बालकांसाठी सुरक्षित आहे.- डॉ. संतोष बोरसे,तालुका आरोग्य अधिकारी, मालेगाव

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांव