00000000000
मालेगाव तालुक्यात आणखी सहा बाधित
जऊळका रेल्वे : आरोग्य विभागाकडून सोमवारी प्राप्त अहवालानुसार, मालेगाव तालुक्यातील आणखी सहा व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. बाधितांमध्ये तालुक्यातील ग्रामीण भागातील व्यक्तींचे प्रमाण अधिक आहे.
00000000000
पोलिसांकडून वाहनांची तपासणी
पोहरादेवी : यवतमाळ जिल्ह्यातून येणारे वाहनचालक नियमांचे उल्लंघन करीत असल्याचा प्रकार मानोरा पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर, पोलिसांनी गत आठवड्यापासून पोहरादेवी परिसरातील मार्गावर वाहनांची तपासणी सुरू केली आहे. यात शुक्रवार ते रविवारदरम्यान १५ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
0000000000000
कोरोना जनजागृतीसाठी कार्यशाळा
शेंदुरजना आढाव : येथून जवळच असलेल्या हिवरा खु. येथे प्रशासनाच्या मार्गदर्शनात कोरोनाविषयक जनजागृतीसाठी कार्यशाळा घेण्यात येत आहे. यात सरपंच, उपसरपंच यांच्यासह ग्रामसचिवांच्या उपस्थितीत आरोग्य पथकाकडून ग्रामस्थांना मार्गदर्शन केले जात आहे.
000000000000
समित्यांना सतर्क राहण्याचे आवाहन
वाशिम : बालविवाह रोखण्यासाठी जिल्ह्यातील ७०० गावांमध्ये बाल संरक्षक समिती स्थापन करण्यात आलेली आहे. गावात किंवा परिसरात कुठेही बालविवाह होत असल्यास तो रोखण्यासाठी समितीमधील सदस्यांनी पुढे यायला हवे. सदस्यांनी नियमित सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुभाष राठोड यांनी केले आहे.
000000000000