शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या वरिष्ठ वेतनश्रेणीचे प्रस्ताव धुळ खात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 16:37 IST

प्रशासकीय दिरंगाईचा फटका बसत असल्याने शिक्षक संघटनांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत शेकडो शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणीचे (चटोपाध्याय वेतनश्रेणी) प्रस्ताव वाशिमसह अमरावती विभागातील जिल्ह्यांत अडीच वर्षापासून प्रलंबित आहेत. प्रशासकीय दिरंगाईचा फटका बसत असल्याने शिक्षक संघटनांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.महाराष्ट्र शासनाच्या २९ जून २००२ च्या निर्णयान्वये प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी (१२ वर्षे) व निवड श्रेणी (२४ वर्षे) लागू केली होती. यासाठी जे शिक्षक पात्र होत असतील अशा शिक्षकांना २०१७ पासून नवीन स्वरुपात प्रशिक्षण देण्याचा निर्णय शासनाने २३ आॅक्टोबर २०१७ रोजी घेतला आणि पात्र होणाऱ्या शिक्षकांची यादी जिल्हा परिषदेच्या संबंधित शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत जाहीर करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या. तथापि, हा शासन निर्णय रद्द करण्यात आला. त्यामुळे पात्र शिक्षकांना शासन निर्णयानुसार चटोपाध्याय वेतनश्रेणी लागू होणे अपेक्षीत होते. यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने खबरदारी घेऊन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पात्र शिक्षकांच्या प्रस्तावांना अंतिम रूप देण्याची प्रक्रिया राबविण्याचे काम तातडीने पूर्ण करणे अपेक्षीत होते; परंतु अडीच वर्षापासून या प्रक्रियेंतर्गत शेकडो शिक्षक पात्र असतानाही शासन निर्णयानुसार निवड श्रेणी व वरिष्ठ वेतन श्रेणीचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. आजवर राज्यातील बुलडाणा, औरंगाबाद, जालना, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, गोंदिया, भंडारा, वर्धा, नांदेड, परभणी, बीड, ठाणे, आणि जळगाव जिल्ह्यातील पात्र शिक्षकांना या वेतनश्रेणीचा लाभ मिळाला तर वाशिम, अकोलासह उर्वरित जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांना या वेतश्रेणीची प्रतिक्षा कायम आहे. वरिष्ठ श्रेणी, निवड श्रेणीच्या प्रस्तावाची छाननी वाशिम जिल्ह्यात सुरू आहे. प्रस्ताव छाननी झाल्यानंतर तातडीने वरिष्ठ श्रेणी, निवड श्रेणीचा प्रश्न निकाली काढला जाईल.-अंबादास मानकरशिक्षणाधिकारी (प्राथमिक)जि.प. वाशिम