वाशिम, दि. ४ : मुद्रा बँक योजनेविषयी जिल्हाभर प्रचार-प्रसार होण्यासाठी सर्वंकष उपक्रम राबवा, अशी सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी पार पडलेल्या मुद्रा बँक योजना समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक के. एम. अहमद, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, जिल्हा अग्रणी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक एस.एस. मेहता, जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग निरीक्षक ए. वाय. बनसोड आदी उपस्थित होते.
'मुद्रा'चा प्रचार करा!
By admin | Updated: September 5, 2016 02:54 IST