शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्याची प्रक्रिया प्रलंबितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 14:19 IST

प्रस्तावांची पडताळणी संथगतीने होत असल्याने अतिक्रमण नियमानुकूल करण्याची प्रक्रिया प्रलंबितच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने ‘सर्वांसाठी घरे २०२२’ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागांतील शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनार्थ केलेले अतिक्रमण नियमानुकूल करण्याच्या धोरणात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत ग्रामपंचायतींकडून अतिक्रमण नियमानुकूल करण्यासंदर्भात प्रस्ताव मागविले आहेत. जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींनी तालुकास्तरावर प्रस्ताव सादर केले आहेत; परंतु या प्रस्तावांची पडताळणी संथगतीने होत असल्याने अतिक्रमण नियमानुकूल करण्याची प्रक्रिया प्रलंबितच आहे.राज्यातील ज्या गावांत शासकीय जमिनीवर १ जानेवारी २०११ किंवा त्यापूर्वी निवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण करून राहणाºया ज्या कुटुंबाला ग्रामपंचायतीच्या हद्दीत निवास व्यवस्था नाही व जे लाभार्थी पंडित दीनदयाल उपाध्याय घरकूल जागा खरेदी अर्थ सहाय्य योजनेंतर्गत पात्र ठरतील, अशा घरकूल पात्र कुटुंबांना भूखंड किंवा मोकळ्या जागेचे वाटप विनामुल्य करण्यात येणार आहे. त्या कुटुंबाच्या काही सदस्यांच्या नावे त्याच ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात घर असेल, असे कुटूंब १ जानेवारी २००० पूर्वीपासून अतिक्रमण करून राहत असेल, तर प्रचलित दर विवरणपत्रानुसार येणाºया किमतीप्रमाणे आणि जर १ जानेवारी २००० नंतर; परंतु १ जानेवारी २०११ पर्यंत अतिक्रमण करून राहत असतील, तर प्रचलित दर विवरण पत्रानुसार येणाºया किमतीच्या दीडपट शुल्क आकारून पर्यायी जागेचे वाटप करण्यात येणार आहे. शासनाच्या निर्देशानुसार यासंदर्भात ग्रामपंचायतीमध्ये ठराव करून याबाबतचा प्रस्ताव संबंधित जिल्हाधिकाºयांकडे सादर करावा लागणार आहे.  या अंतर्गत तालुकास्तरावर काही ग्रामपंचायतींनी अहवाल सादरही केले आहेत. आता ग्रामपंचायतींच्या अहवालाची पडताळणी प्रक्रिया करण्यात येत असून, ही प्रकिया संथगतीने सुरू असल्याने अतिक्रमण नियमानुकूल करण्याची प्रक्रिया अद्याप प्रलंबितच आहे.

टॅग्स :washimवाशिम