शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये समस्यांचा भडिमार; औषधीचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 13:47 IST

पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये इतरही विविध समस्या निर्माण झाल्याने पशुपालक त्रस्त झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आॅगस्ट, सप्टेंबर या महिन्यात गुरांना प्रामुख्याने घटसर्प, फऱ्या आजारांची लागण होते. त्यापासून गुरांचा बचाव करण्यासाठी लसीकरण मोहिम राबविणे आवश्यक आहे. असे असताना जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये या मोहिमेस अद्यापपर्यंत सुरूवातच झाली नसून औषधीचा देखील तुटवडा जाणवत आहे. पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये इतरही विविध समस्या निर्माण झाल्याने पशुपालक त्रस्त झाले आहेत.वाशिम येथे जिल्हा पशु सर्व चिकित्सालय कार्यान्वित असून मंगरूळपीर, कारंजा आणि रिसोड या शहरांमध्ये तालुका लघू पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय आणि ५८ गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणारे पशुवैद्यकीय दवाखाने कार्यान्वित आहेत. यामाध्यमातून गुरांच्या आरोग्याची निगा राखणे, त्यांना जडणाºया आजारांचे निदान करून योग्य औषधोपचार करण्यासह वेळोवेळी लसीकरण मोहिम राबविणे क्रमप्राप्त आहे. प्रत्यक्षात मात्र जिल्हा पशु सर्व चिकित्सालयासह लघू पशुवैद्यकीय चिकित्सालये व पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. मंजूर असलेल्या जेमतेम १७ पशुधन विकास अधिकाऱ्यांपैकी ७ पदे रिक्त असून दोघांची बदली झाल्याने कामकाज वारंवार प्रभावित होत आहे. पशुधन पर्यवेक्षकांचीही अनेक पदे रिक्त असल्याने जनावरांच्या आरोग्याची निगा राखणे अशक्य होत असून उद्भवलेल्या असुविधांमुळे पशुपालक अक्षरश: जेरीस आले आहेत. लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या इमारत परिसरातही सर्वत्र घाण आणि निरूपयोगी झाडे उगवल्याचे दिसून येत आहे.

३० हजार लसी प्राप्त; पण मोहिम थंडबस्त्यातपावसाळ्यात जनावरांना प्रामुख्याने घटसर्प आणि फºया या आजारांची लागण होते. वेळीच निदान होऊन लस आणि योग्य औषधोपचार न मिळाल्यास या आजारात जनावराचा मृत्यू देखील ओढवू शकतो. त्यानुषंगाने जिल्ह्याला ३० हजार लसी प्राप्त झाल्या आहेत; पण अपुºया मनुष्यबळामुळे मोहिम थंडबस्त्यात आहे.

१४ हजार पशूधनाच्या आरोग्याची जबाबदारी असलेलया शिरपूर पशुवैद्यकीय केंद्रात सुविधा मिळत नसल्याने नाईलाजास्तव खासगी डॉक्टरांची मदत घ्यावी लागते. पशुवैद्यकीय केंद्रात गत महिनाभरापासून औषधीचाही तुटवडा जाणवत आहे. प्रशासनाने शिरपूरला कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी देण्यासोबतच उद्भवलेल्या समस्या दुर कराव्या.- विजय कदमपशुपालक, शिरपूर जैन (ता.मालेगाव)

जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येत असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये गत काही दिवसांपासून निश्चितपणे औषधीचा तुटवडा होता; मात्र आता हा प्रश्न निकाली निघाला असून औषधीचा पुरवठा केला जात आहे. याशिवाय प्रत्येक तालुक्यास घटसर्पच्या ६ हजार लसी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तुलनेने अपुरे मनुष्यबळ असतानाही चोख सेवा देण्याचा प्रयत्न आहे.- डॉ. व्ही.एन. वानखडेजिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिम