शहरं
Join us  
Trending Stories
1
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
2
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
3
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
4
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
5
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
6
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
7
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
8
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
9
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
10
Viral Video: छोटा पॅकेट, बडा धमाका !! चिमुरडीने केला अफलातून डान्स, नेटकऱ्यांची जिंकली मनं
11
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?
12
लव्ह ट्रँगलचा भयंकर शेवट! माजी लिव्ह-इन पार्टनरने केली गर्भवतीची हत्या, पतीने घेतला आरोपीचा जीव
13
जियोफायनान्सकडून डिजिटल गोल्ड खरेदीवर २% सोने मोफत; सोबत १० लाख रुपयांपर्यंतची बक्षिसेही
14
Mitchell Starc Bowling Speed : स्टार्कनं खरंच रोहितला 'वर्ल्ड रेकॉर्ड' सेट करणारा वेगवान चेंडू टाकला?
15
सोमवारी बँक सुरू की बंद? दिवाळीच्या दिवशी बँकेत जाण्यापूर्वी RBI ची सुट्टीची यादी नक्की तपासा!
16
IND vs AUS 1st ODI : गिलनं साधला मोठा डाव! महेंद्र सिंह धोनीचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड मोडला
17
Parineeti Chopra : परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा, अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्याचे आगमन
18
संतापजनक! अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये वापरलेल्या प्लेट्स धुवून दिलं जेवण, प्रवाशांच्या जीवाशी खेळ
19
'द केरला स्टोरी' फेम अदा शर्माचं खरं नाव माहितीये? वेगळं नाव का वापरावं लागलं? म्हणाली...
20
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियानं केल्या १३६ धावा, पण ऑस्ट्रेलियाला मिळालं १३१ धावांचं टार्गेट; कारण...

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 17:22 IST

Agriculture News रब्बी हंगामात पेरणीसाठी पैशांची जूळवाजुळव कशी करावी? याची चिंता शेतकºयांना लागली आहे.

मूंगळा : यावर्षी संततधार आणि सततच्या पावसामुळे मूंगळा परिसरात सोयाबीनच्या उत्पादनात कमालिची घट येत असल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणीत वाढ झाली. अनेक शेतकºयांचा शेतीतील लागवड खर्चही वसूल होत नसल्याने रब्बी हंगामात पेरणीसाठी पैशांची जूळवाजुळव कशी करावी? याची चिंता शेतकºयांना लागली आहे.यावर्षी पावसात अनियमितता असल्याने याचा फटका शेतकºयांना बसत आहे. मुंगळा परिसरातील शेतकºयांना मूग व उडीदाच्या एकरी उत्पादनात प्रचंड घट आली. त्यानंतरही पावसाने अधूनमधून हजेरी लावली. सोयाबीन सोंगणी व काढणीच्या हंगामातही पाऊस आला. त्यामुळे अनेक शेतकºयांचे सोयाबीन भिजले. गत पाच, सहा दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्याने मुंगळा परिसरात सोयाबीन पिकाची काढणीला जोरात सुरू आहे. शेतीची मशागत, बी-बियाणे, पेरणीचा खर्च आणि कापणी तसेच मळणी यंत्र आदीवर १५ ते १७ हजार रुपयापर्यंत खर्च आला आहे. अनेक शेतकºयांना एकरी ४ ते ५ क्विंटल उतार येत आहे. हलक्या दर्जाच्या जमिनीत तर एक ते तीन क्विंटलदरम्यान उतार आहे. लागवड खर्च वजा करता शेतकºयांना फारशी मिळकत नाही. त्यामुळे रब्बी हंगामात पेरणीसाठी जूळवाजुळव करावी लागणार आहे.

बाजारभावही समाधानकारक नाहीसोयाबीन भिजल्याने बाजारभाव समाधानकारक नाही. काही शेतकºयांचे सोयाबीन दर्जेदार असतानाही, समाधानकारक बाजारभाव मिळत नसल्याचे दिसून येते. प्रती क्विंटल २८०० ते ३३०० रुपयादरम्यान सोयाबीनची खरेदी केली जात आहे. यामुळे शेतकºयांमधून रोष व्यक्त होत आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती